मदर इंडिया : इंदिरा गांधी यांचे राजकीय चरित्र (Marathi)

Pranay Gupte

Physical

Available

'मदर इंडिया' हे पुस्तक म्हणजे स्वतंत्र भारतातील सर्वाधिक गुंतागुंतीच राजकीय व्यक्तिमत्त्व असलेल्या श्रीमती इंदिरा गांधी यांची कथा आहे. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची ही एकाकी अशी मुलगी. ती स्वत: च देशाची प्रंतप्रधान होऊ शकेल अशा प्रकारे तिची वाढ झाली. नेहरूंच्या घरातील मितभाषी 'इन्दू', अर्थात इंदिरा गांधी पुढे विसाव्या शतकातील एक महान नेत्या म्हणून नावारूपास आल्या.

त्या त्यांच्या कारकिर्दीच्या सर्वोच्च शिखरावर असताना त्यांची तुलना भारतमाता- मदर इंडियाशी केली जायची. त्यांचे जीवन आणि कारकीर्द प्रणय गुप्ते यांनी यथार्थपणे उलगडून दाखवली आहे. त्यांची 'गरिबी हटाव'ची घोषणा आणि हरितक्रांती घडवून आणण्यासाठीचे प्रयत्न यांनी मतदारांना आकर्षित केले असले, तरी त्या सत्तेवर असताना व नसतानाही त्यांना वादंग आणि टीका यांना सामोरे जावे लागले. आपले एकमुखी नेतृत्व प्रस्थापित करण्यासाठी इंदिराजींनी १९६० च्या दशकात पक्षात फूट पाडली.

१९७१ च्या पाकबरोबरच्या युद्धातील दणदणीत विजय या उजळ गोष्टींबरोबरच १९७५ ची कुप्रसिद्ध आणिबाणी आणि शेवटी 'ऑपरेशन ब्लू स्टार' जे ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी झालेल्या त्यांच्या निर्घृण हत्येस कारणीभूत ठरले; यांपैकी इंदिरा गांधींचा वारसा नेमका कोणता हे अजून निश्चित सांगता येत नाही.

हे समग्र चरित्र केवळ एक परिपूर्ण व्यक्ती म्हणून त्यांची कारकीर्द, त्यातील विसंगती एवढेच उलगडून दाखवत नाही, तर एक मुलगी, पत्नी आणि आई म्हणून त्यांची जडणघडण, भूमिका आणि भवतालच्या माणसांशी त्यांचे परस्परसंबंध कसे होते हेदेखील यात उलघडून दाखवले आहे. जिवंत प्रसंग आणि सुयोग्य दुष्टिकोन दर्शवणारे हे पुस्तक जसे इंदिरा गांधींचे परिपूर्ण शब्दचित्र आहे, तसेच ते विसाव्या शतकातील भारतीय राजकरणाचे टोकदार विश्लेषण करणारे आहे.

Language Marathi
ISBN-10 9789383850693
ISBN-13 9789383850693
No of pages 449
Font Size Medium
Book Publisher manovikas prakashan
Published Date 01 Jan 2011

About Author

Author : Pranay Gupte

1 Books

इंदिरा गांधी यांचे राजकीय चरित्र.

Related Books