लाईमलाईट (Marathi)

Achyut Godbole

Physical

In Circulation

नाट्यशास्त्र, साहित्य, गायन, वादन, नृत्य, चित्रकला, शिल्पकला, वास्तुशास्त्र आणि स्थापत्त्यशास्त्र अशा अनेक कलाप्रकारांनी जगभरातल्या संस्कृतींवर गेली अनेक शतकं आपला प्रभाव टाकला. त्यानंतर विसाव्या शतकाच्या सुरुवातीला चित्रपट हे माध्यम विकसित झालं आणि त्यानं केवळ एका शतकात आधीच्या सर्व कला आपल्यात शोषून घेतल्या. त्या सर्व कलाप्रकारांचा वापर करून चित्रपट हे ताकदीचं माध्यम जगभरातल्या सर्व प्रेक्षकांच्या मनावर आरुढ झालं.

चित्रपटांच्या सुरुवातीच्या काळापासून ते आजच्या डिजिटल तंत्रयुगापर्यंत चार्ली चॅप्लीन, आल्फ्रेड हिचकॉक यांच्यापासून ते स्टीव्हन स्पीलबर्गसारख्या आधुनिक हॉलिवूड दिग्दर्शकांनी; मार्लन ब्रँडो आणि सोफिया लॉरेनसारख्या उमद्या आणि अभिनयसंपन्न कलावंतांनी तसंच हॉलिवूड बाहेरच्या आयझेनस्टाईन, इंगमार बर्गमन, अकिरा कुरोसावा अशांसारख्या वेगळी आणि अनवट वाट चोखाळणार्या दिग्दर्शकांनी या माध्यमाला समृद्ध करण्यात मोलाची भर घातली आहे.

अतिशय रंजकपणे ‘लाईमलाईट’ या कलाकारांच्या चित्रपटांबद्दल वाचकांशी संवाद साधतं. त्यामुळे या कलाकारांच्या चिरंतन टिकून रहाणार्या चित्रपटांचं वाचकांना आकर्षण वाटेलच पण रसिक वाचक त्या कलाकारांच्या अतिशय संघर्षमय, चित्तथरारक आणि रोमहर्षक आयुष्यांच्याही प्रेमात पडतील!

Language Marathi
ISBN-10 9385266896
ISBN-13 9789385266898
No of pages 549
Font Size Medium
Book Publisher manovikas prakashan
Published Date 01 Jan 2016

About Author

Author : Achyut Godbole

6 Books

अच्युत गोडबोले आणि निलांबरी जोशी लिखित लाईम लाईट विदेशी चित्रपटसृष्टीची...! अनोखी यात्रा

Related Books