रहस्य नागांचे (Marathi)

Amish Tripathi

Physical

Available

आज तो देव आहे. चार हजार वर्षांपूर्वी तो फक्त एक पुरूष होता.

शोध सुरूच आहे. अशुभसूचक नाग योद्ध्याने त्याच्या मित्राला; बृहस्पतीला ठार मारले आणि आता त्याच्या पत्नीच्या मागे तो हात धुऊन लागला. तिबेटहून आलेला शिव हा स्थलांतरित सैतानाचा संहार करणार असल्याचे भाकीत आहे. आपल्या राक्षसी शत्रूचा शोध घेतल्याशिवाय तो मुळीच थांबणार नाही. मित्राच्या मृत्यूचा सूड घेण्याची तळमळ आणि सैतानापर्यंत पोहोचण्याच्या मार्गाचा शोध या दोन गोष्टी आपल्याला नागांच्या दारापर्यंत पोहोचवतील, याची त्याला खात्रीच होती.

द्वेषी सैतानाच्या उद्याचा पुरावा सर्वत्रच आढळतो. एका जादूई औषधावर अवलंबून असल्यामुळे एक राज्य मृत्युपंथाला लागते. एक अनभिषिक्त राजकुमाराचा खून होतो. शिवाचे तत्वज्ञानविषयक मार्गदर्शक असलेल्या वासुदेवांवर शिवाचा गाढ विश्वास असतो. मात्र दुष्टांचे सहाय्य घेऊन ते त्याचा विश्वासघात करतात. अगदी परिपूर्ण साम्राज्य वाटणारे मेलुहासुद्धा जन्मांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मौकामधील भयानक रहस्यामुळे मलिन झालेले असते शिवाला अज्ञात |असलेला मुख्य सूत्रधार एक मोठाच खेळ खेळत असतो.

प्रांचीन भारताच्या संपूर्ण सीमारेषांपर्यंत नेणारा प्रवास केल्यावर शिवाला प्रचंड गूढ गोष्टींनी भरलेल्या प्रदेशातील सत्याचा शोध लागतो आणि त्याला समजते की, जसे वाटत होते, तसे तिथे काहीच नव्हते.

भयानक युद्धे खेळली जातील, आश्चर्यजनक फसव्या युती केल्या जातील. शिवावरील.तीन पुस्तकांच्या मालिकेतील 'मेलुहाचे मृत्युंजय' हे पहिले पुस्तक राष्ट्रीय पातळीवर उत्तम खपाचे पुस्तक ठरले आहे. त्याचाच पुढचा भाग असलेल्या या पुस्तकात अविश्वसनीय वाटणाऱ्या रहस्यांचा भेद होईल.

Language Marathi
ISBN-10 9383260297
ISBN-13 9789383260294
No of pages 425
Font Size Medium
Book Publisher Westland
Published Date 20 Sep 2013

About Author

Author : Amish Tripathi

4 Books
  • भगवान महादेवाच्या जीवनावर आधारित कादंबरी! पौराणिक कथा, पुरातत्त्वशास्त्र आणि परंपरा यावर आधारित असणारी भगवान शंकराची कथा वाचकाला खिळवून ठेवते. भारतातील दंतकथा, लोककथा आणि पुराणकथा यांचा हा अप्रतिम मिलाप आहे. देव, संस्कृती, इतिहास, असुर आणि नायक यांच्याविषयीचे आपले दृष्टिकोन कायमस्वरूपी बदलून टाकण्याचे सामर्थ्य या कथेत आहे. निलकंठाविषयीचे कोणते रहस्य यापुढे उलगडले जाणार आहे.
  • याचे कुतूहल सतत वाढत जाते. आपल्या कर्मामुळे...कर्तृत्वामुळे एक पुरुष देवत्वापर्यंत कसा पोहोचला याची ही चित्तवेधक कहाणी आहे. प्राचीन भारताच्या समृद्ध पौराणिक परंपरेचा वेध या पुस्तकांमधून घेतला आहे. ऐतिहासिक वस्तुस्थिती आणि कल्पनाविलास यांमधून हे पुस्तक आकाराला आले आहे.
  • भगवान महादेवाच्या जीवनातून शिकवण घेत आपण सारेच जण अधिक चांगल्या व्यक्ती म्हणून जगू शकू. प्रत्येक व्यक्तीमध्ये देव बनण्याची क्षमता दडलेली असते, हा या कहाणीचा अन्वयार्थ आहे.

Related Books