हसवणूक (Marathi)

Pu. La. Deshpande

Physical

In Circulation

प्राण्यांना बुध्दिमत्ता असते का? ते विचार करू शकतात का? त्यांना मन असतं का? भावना असतात का? स्वत:च्या अस्तित्वाची जाणीव असते का? आत्मभान असतं का? काही वेळा प्राण्यांची हुशारी बघून आपल्यावर आश्चर्यानं तोंडात बोट घालायची पाळी येते. कधी कधी तर ते अशा काही करामती करतात, की आपण चक्रावूनच जावं. हे सगळं ते उपजत प्रेरणेनं करतात की विचारपूर्वक?

माणसाच्या तुलनेत प्राण्यांची बुध्दिमत्ता कुठल्या पातळीवर असते? मुळात बुध्दिमत्ता म्हणजे तरी काय? मुंगीपासून ते हत्तीपर्यंत आणि चिलटापासून ते चिंपँझीपर्यंत अनेक प्राण्यांवर गेल्या पाचसहा वर्षांत 'वर्तनशास्त्र' या विषयासंदर्भात प्रचंड संशोधन झालं आहे. त्या आधारे या प्रश्नांचा धांडोळा घेणारं हे पुस्तक. शास्त्रशुध्द पध्दतीनं, काटेकोर शब्दांत पण ललित अंगानं लिहिलेलं. खुसखुशीत भाषेत, भरपूर उदाहरणांच्या साहाय्यानं विषय सोपा करून सांगणारं. प्राण्यांबद्दल कुतूहल असणाऱ्या प्रत्येकानं वाचायलाच हवं, असं आगळंवेगळं पुस्तक.

Language Marathi
ISBN-10 9350910403
ISBN-13 9789350910405
No of pages 155
Font Size Medium
Book Publisher Mauj
Published Date 01 Dec 2013

About Author

Author : Pu. La. Deshpande

29 Books

Related Books