मानसी पूल नसलेली नदी (Marathi)

Prafful Shiledar

Physical

Available

स्त्री-पुरुषांच्या सत्तासंबंधातील सुखविणाऱ्या - दुखविणाऱ्या तपशिलांची तीव्रता आणि खोली नमूद करीत जाणाऱ्या मल्याळम् लेखिका मानसी यांच्या कथा धारदारपणे बौद्धिक आहेत. एखादया शल्यचिकित्सकाच्या कौशाल्याने उपरोध आणि मर्मदृष्टीचा वापर करीत असतानाही त्या मानवी संबंधातील आस्थेची हळूवार जपणूक करताना दिसतात.

स्त्री- लेखकांमध्ये विरळपणे आढळणारा कथांच्या आकृतिबंधाबाबतचा त्यांचा सजगपणा लक्षणीय आहे. परंपरेचा पुनर्विचार आणि आत्मभानाचा उच्चार करणाऱ्या या कथांची काव्यत्मकता मल्याळम् साहित्यात मानसी-विशिष्ट गणली गेली आहे. प्रफुल्ल शिलेदारांनी ही काव्यत्मकता कसोशीने जपून केलेले अनुवाद मूळ कथांच्या तरलपणाचा प्रत्यय देतात.

- सुखमणि रॉय

Language Marathi
ISBN-10 B07MY18TZY
No of pages 140
Font Size Medium
Book Publisher manovikas prakashan
Published Date 01 Jan 2015

About Author

Author : Prafful Shiledar

1 Books

Related Books