हॅव नाईस डे (Marathi)

Dr. Rajendra Barve

Physical

Available

चांगला दिवस जाण्यासाठी कशाची आवश्यकता असते,

या प्रश्नाचं उत्तर फक्त एकच आहे. सकारात्मक दृष्टीकोनाची.

आनंद शोधणाऱ्या दृष्टीची . ही दृष्टी देणारं हे पुस्तक आहे.

डॉ. राजेंद्र बर्वे यांनी छोट्या छोट्या लेखांतून रोजचा दिवस आनंदात

घालवला, तर एक एक दिवस करून सगळे आयुष्यच आनंदात जाईल, असा मंत्र

दिला आहे. या लेखनात रोजच्या आयुष्यातील छोट्या मोठ्या गोष्टींचे संदर्भ येतात.

मोबाईल, लँपटॉप, डायरी, रेडीओपासून निसर्ग, वसंत ऋतूसारख्या विषयांचा आधार घेत.

लेखकानं आशय मांडला आहे. धकाधकीच्या जीवनातही 'हॅव अ नाईस डे' हे चार

शब्द कशी जादू करतात, याचंच उदाहरण या पुस्तकात वाचायला मिळतं..

रोजची सकाळ धावपळीची, कामाची असते. ऑफिस, शाळा, स्वयंपाक याच्या घाइगडबडीत

उसंत मीळत नसते. पण या कामाच्या धबडग्यात सकाळ प्रसन्न झाली तर संपूर्ण दिवस आनंदात जातो,

हा अनुभव सर्वांना देण्याचा प्रयत्न डॉ. राजेंद्र बर्वे यांनी ‘हॅव अ नाइस डे’ मधून केला आहे.

त्यांनी विविध विषयांवर व्यक्त केलेले विचार, ताज्या विषयांवरील चिंतन, तत्वचिंतन, आत्मचिंतन वाचून प्रत्येकाची सकाळ प्रसन्न होईल.

Language Marathi
ISBN-10 9380264291
ISBN-13 978-9380264295
No of pages 143
Font Size Medium
Book Publisher manovikas prakashan
Published Date 01 Jan 2010

About Author

Author : Dr. Rajendra Barve

1 Books

Related Books