बराक ओबामा: बदलत्या जगाचा 'सक्सेस पासवर्ड' (Marathi)

Sanjay Awate

Physical

Available

नव्या जगात झेपावण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी इच्छा बाळगणा-या प्रत्येकासाठी

बराक हुसेन ओबामांनी अवघ्या अमेरिकेला हे सांगितले आणि मग ते घडले, ज्याची कल्पनाही कोणी कधी केली नसेल! बराक हुसेन ओबामा हा बदललेल्या जगाचा खणखणीत पुरावा तर आहेच; पण त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे, नव्या जगाला त्यांनी नवी उमेद दिली आहे...

नवी प्रकाशवाट दिली आहे. शिवाय, हे 'ओबामा मॉडेल' असे आहे की ज्याची 'कॉपी' करणे कोणालाही कोणत्याही समूहात शक्य व्हावे. कारण तो बदलत्या जगाचा ' सक्सेस पासवर्ड' आहे. ओबामा म्हणाले त्याप्रमाणे, त्यांचा हा विजय म्हणजे बदल नव्हे; बदलाची संधी फक्त आहे. ती ओळखण्यासाठी हवी ओबामांची कल्पकता आणि स्वप्नांना वास्तवाचा चेहरा देण्यासाठी 'येस, वी कॅन' अशी दुर्दम्य आकांक्षा.

नव्या पिढीकडे हे सारे आहे. म्हणूनच तर इथेही नवे ओबामा अवतरणार आहेत. उगवतीच्या दिशेने झोपावण्यासाठी ओबामांचेच शब्द आपल्याला उसने घ्यावे लागणार आहेत... धिस इज अवर टाइम!

Language Marathi
ISBN-10 9385266209
ISBN-13 9789385266201
No of pages 200
Font Size Medium
Book Publisher manovikas prakashan
Published Date 01 Jan 2008

About Author

Author : Sanjay Awate

1 Books

Related Books