प्रकाशवाटा (Marathi)

Dr , prakash amte

Physical

Available

'आदिवासींना मुख्य प्रवाहात आणावं, त्यांची पिळवणूक थांबावी आणि त्यांना माणूस म्हणून जगण्याची संधी मिळवून द्यावी, असं बाबांच्या मनात होतं. या कामाची जबाबदारी मी घेतली आणि सर्वांनी मिळून ती पार पाडली. बाबांचं हे स्वप्न हेमकलशात प्रत्यक्षात कसं उतरतंय, त्यांची ही गोष्ट. म्हटली तर माझ्याही जीवनाची गोष्ट.' ‌म‌ॅगसेसे पारितोषिक विजेते डॉ. प्रकाश आमटे यांनी साकार झालेल्या स्वप्नांची ही गोष्ट 'प्रकाशवाटा'मध्ये शब्दबद्ध केली आहे.

आनंदवनातले दिवस, त्या बाहेरचं जग, हेमलकसा येथील आव्हानात्मक चित्र पुस्तकाच्या प्रारंभी उभं राहतं. कसोटीचे प्रसंग आणि जिवावरचे प्रसंग थरारून टाकतात. हेमलकशातील प्राण्याचं गोकुळ भारावून टाकतं. दुर्गम भागात गेली चार दशकं सुरु असलेल्या नि:स्वार्थ कामाची ही ओळख संस्मरणीय ठरते.

Language Marathi
ISBN-13 B00IBYD0QS
No of pages 155
Font Size Medium
Book Publisher samkalin prakashan
Published Date 01 Jan 2013

About Author

Author : Dr, prakash amte

1 Books

Related Books