गव्हर्नन्स फॉर ग्रोथ इन इंडिया (Marathi)

Manoj Ambika

Physical

Available

दिवंगत माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या या पुस्तकाचा मनोज अंबिके यांनी अनुवाद केला आहे.

'मतदानाचा अधिकार ' अमूल्य आहे. आणि तो बजावणे गरजेचे आहे. तो बजावल्यामुळे एक नागरिक म्हणून तुम्ही केंद्रामध्ये किंवा राज्यामध्ये एक चांगलं सरकार विकसित करण्यासाठी मदत करता,' असे डॉ. कलाम लिहितात.

प्रत्येक मतदाराने आपला मताधिकार काळजीपूर्वक आणि विचारपूर्वक कसा बजावावा, याचे मार्गदर्शन ते करतात. सर्जनशील, नेतृत्व, सुशासन, ई-गव्हर्नन्स, माहिती अधिकार, पारदर्शक कारभार आदी घटकांचा त्यांनी उहापोह केला आहे.

Language Marathi
ISBN-10 8192702022
ISBN-13 9788192702025
No of pages 160
Font Size Medium
Book Publisher Mirror Publishing
Published Date 01 Jan 2014

About Author

Author : Manoj Ambika

4 Books

भारतामध्ये वेळोवेळी निवडणुका होत असतात. आणि नेहमीच सर्व मतदारांमध्ये सत्ता आणि निवडणुका याविषयी वादविवाद आणि चर्चा चालू असतात. हे पुस्तक म्हणजे, राष्ट्रीय जीवन अतिशय जवळून पाहिलेल्या एका व्यक्तिमत्त्वाच्या दूरदृष्टीतून आलेलं निवेदन होय. प्रत्येक नागरिकाने ते वाचायलाच हवं आणि समजून घ्यायला हवं.

डॉ. ए.पी.जे. अब्दूल कलाम, भारताचे अकरावे राष्ट्रपती, शास्त्रज्ञ, तंत्रज्ञान विशेषज्ञ, शिक्षक आणि थोर विचारवंत आहेत. संपूर्ण भारतभर प्रवास, दौरे करून जवळजवळ 17 दशलक्ष युवकांशी त्ङ्मांनी संवाद साधला आहे. या पुस्तकात त्यांनी त्यांचा प्रचंड अनुभव आणि सखोल दृष्टिकोन वापरून शासनाच्या विविध घटकांची चर्चा केली आहे.

Related Books