सात सक्कं त्रेचाळीस (Marathi)

Kiran Nagarkar

Physical

Available

आज मी घरी जाणार नाही. या इथं कठड्यावर झोप आली तर रेनकोट आहेच. तीन वर्षे झाली, माझ्याकडं आहे. कोणी आणला त्याला आमच्या घरी, मला आठवत नाही. कॅप ठेवायला विसरला तो जोराचा पाऊस आला, तर मी पॉलिथिनची बॅग घालतो. आभाळ खाली आलंय  भरून मी हात वर केला, तर माझ्यावर सारा भार टाकेल. अर्धा तास झाला. अजून कोसळलं नाही.

कदाचित कोसळणारही नाही. फक्त काळं, अधूनमधून आतल्या आत चमकणारं काळं पाणी, आकाश, भेदरलेले पुसट निळे दिवे आणि मी. विलक्षण शांत आहे आजचा समुद्र. सहा फूट खाली. भिंतीला चाटत. आपल्या साऱ्या शरीरावर ताबा आहे त्याचा. एक प्रचंड काळा मोबीडिक आपल्या प्रत्येक स्नायूवरल - सात सक्कं त्रेचाळीस

Language Marathi
ISBN-10 9382364293
ISBN-13 9789382364290
No of pages 220
Font Size Medium
Book Publisher Shabda Publication
Published Date 01 Jan 2014

About Author

Author : Kiran Nagarkar

5 Books

Related Books