'आयडियाज् आर् डेंजरस्' या लेखसंग्रहात मी वेगवेगळ्या कालखंडात लिहिलेले आठ लेख समाविष्ट करण्यात आलेले आहेत. हे लेख वेगवेगळ्या विषयांशी संबंधित आहेत. वरवर पहाता त्यात विषयांचा खूपच वेगळेपणा असला तरीही त्यांना बांधून ठेवणारा एक आंतरीक धागा पक्का आहे. 'शिवसेना: भासमान आणि वास्तविक (अक्षर : 2003)' सारख्या लेखात आणि ' मराठ्यांचा जो भूतकाळ तोच त्यांचा भविष्यकाळ (सामना : 2003)' या लेखामध्ये ज्या समाजगटासंबंधी भाष्य केलेल आहे तो समाजगट एकच आहे.
काळाबरोबर या समाजगटाच्या रचनेमध्ये सतत बदल होतो आहे. परंतु लेखामधली गृहितकं आणि निष्कर्ष आजही बदललेले नाहीत. हे लेख काही कालावधीनंतर वाचताना मला त्यात अजून खूप भर घालावीशी वाटली. ती भर या पुस्तकाच्या निमित्ताने लगेच इथे न घालता पुढे याच विषयांवर स्वतंत्रपणे विस्ताराने लिहिणे मला आवडेल. तरी काही ठिकाणी आवश्यक त्या संदर्भांमध्ये बदल केलेले आहेत.