क्रॅकिंग द कोड (Marathi)

Tahira Kashyap , Ayushmann Khurrana

Physical

Available

बॉलीवूडची चमचमती दुनिया, त्यातील? नाट्य तुम्हाला भावत असेल, ही दुनिया आपली व्हावी अशी उर्मी तुमच्या मनात असेल, तर इथे व्यावसायिक नट म्हणून पदार्पण करण्याची योग्य वेळ कशी ओळखावी? चित्रपट व टीव्हीच्या कलाक्षेत्रात प्रवास करताना कोणकोणत्या अडवणींचा सामना करावा लागतो? ही वाट तुम्हाला कुठपर्यंत घेऊन जाऊ शकेल? आणि सर्वात कळीचा मुद्दा म्हणजे, हे सर्व तुम्ही कसे घडवून आणाल?

'क्रॅकिंग द कोड' मध्ये प्रसिद्ध अभिनेता, गायक, टीव्ही कलाकार आयुष्मान खुराना या मायानगरीतील यशाचे गमक क्रमाक्रमाने सांगत आहेत. स्वत: च्या उमेदवारीच्या काळातील अनुभवांचे किस्से सांगताना त्यावरून घ्यायचा बोध ते आपल्यापर्यत पोहोचवतात. आयुष्यान यांचा टिव्हीवरील रिॲलिटी शोमधील सहभाग ते रेडिओचा खास आवाज, टिव्ही मालिकेतील नट ते रिॲलिटी मालिकांचा सर्वाधिक मागणी असलेला सूतधार असा भरगच्च प्रवास आहे.

Language Marathi
ISBN-10 9385665723
ISBN-13 9789385665721
No of pages 94
Font Size Medium
Book Publisher Vishwakarma Publications
Published Date 01 Jan 2017

About Author

Author : Ayushmann Khurrana

1 Books

हे पुस्तक अशा व्यक्तीचे आत्मचिंतन आहे. जो फिल्मी दुनियेत कोणतेही लागेबांधे नसतानाही घट्ट पाय रोवून उभा आहे. आश्‍चर्य म्हणजे, प्रसिध्द आडनावांपलीकडे न पाहणा-या या चित्रपटसृष्टीने याला मात्र आपलेसे केले आहे. हे अतिशय गुंतवून ठेवणारे , लक्षवेधी पुस्तक झालेले आहे.

Related Books