चक्रीवादळ (Marathi)

Prabhakar Pandharkar

Physical

In Circulation

महासागराच्या तळाशी झालेल्या धरणीकंपानं उठवलेल्या महाकाय लाटेनं केलेल्या मनुष्यहानीनं आणि घरादारांच्या विनाशानं आज सगळं जग हाटरलं आहे. जगभरातले असंख्य हात आणि मदतीचा ओघ पुनर्वसनासाठी करुणेनं पुढं होत आहेत.

त्याची आठवण करून देणारी, सुमारे पंचवीस वर्षापूर्वी आंध्रच्या सागरकिनाऱ्यावर घोंगावत आलेल्या राक्षसी चक्रीवादळाच्या हाहाकाराची ही विदारक कहाणी आहे. मनाचा थरकाप उडवणाऱ्या त्या रुद्र वास्तवाचं विदीर्ण व विषण्ण करणारं चित्रण व्यवसायाचा भाग म्हणून प्रभाकर पेंढारकर यांनी कॅमेऱ्यात बंदिस्त केलं; तरीही त्यांच्यामधला सर्जनशील लेखक इतकी वर्ष उलटूनही त्या मुळापासून हादरवून टाकणाऱ्या ‘अनुभवानं अस्वस्थच राहिला. आज ‘चक्रीवादळ’ या कादंबरीच्या रूपानं त्यांची ती अस्वस्थताच मूर्त होत आहे.

हा हाहाकार जसा अगणित गोरगरीब आणि सुखवस्तू माणसांच्या भेदातीत मृत्यूचा, तसा मागं उरलेल्यांच्या अनेक स्वप्नांचा व आकांक्षांचाही; त्यांच्या हतबल मनांचा तसा आपल्याच घरादारांतून निर्वासित होण्याच्या असहायतेचा व निराधारतेचाही. हा हाहाकार पिढ्यानपिढ्यांना विकल करणारा; पण त्याला शांतवण्याचा प्रयत्न करणारी यातली माणुसकीची तितकीच समर्थ सत्त्वशील करुणा मात्र चकित व आश्वस्त करणारी.

‘चक्रीवादळ' ही कादंबरी असूनही त्यातलीं वळणं वाकणं रूढार्थानं कादंबरीसारखी नाहीत. आहे तो एक वा.ड्मयीन कोलाज : एकाच भयाण वास्तवाच्या असंख्य छटांचा निर्घुण मृत्यूनं पोळलेली मनं, त्यांच्या प्राणान्तिक जखमा, तरी जगण्याचा अपरिहार्य, दुर्दम्य संघर्ष, आणि या संघर्षाला सावरणारे मदतीचे उबदार हात या साऱ्यांचाच.

पेंढारकरांच्या ‘रारंग ढांग’ या कादंबरीनं आपलली मुद्रा मराठी वाचकांच्या मनावर खोल उमटवली आहे. चक्रीवादळ' ही वास्तवदर्शी कादंबरी पुढचं वेगळं नि प्रभावशाली पाऊल आहे.

Language Marathi
ISBN-10 9350910365
ISBN-13 9789350910368
No of pages 165
Font Size Medium
Book Publisher Mauj Prakashan
Published Date 01 Jan 2013

About Author

Author : Prabhakar Pandharkar

2 Books
  • मानवाने कितीही प्रगती केली, तरी निसर्गापुढे तो खुजा आहे. दुष्काळ, भूकंप, वादळ अशा प्रसंगी ते प्रकर्षाने जाणवते. निसर्गाचे रौद्र रूप मानवाला होत्याचा नव्हते करते. याचा अनुभव नोव्हेंबर १९७७ मध्ये आंध्र प्रदेशच्या सागरी किनारपट्टीला चक्रीवादळाचा तडाखा बसला आणि एकच हाहाकार उडाला.
  • वादळाबरोबरच मुसळधार पाऊस, सागराच्या लाटांनी उद्ध्वस्त केलेली जमीन, तीस हजार माणसांच्या मृत्यूचे तांडव देशाने पाहिले. त्याचे चित्रण प्रभाकर पेंढारकर यांनी ‘चक्रीवादळ’ या कादंबरीत केले आहे. सत्य घटना, प्रसंग, यामुळे निसर्गाने निर्माण केलेले एक भयाण वास्तव पुढे येते.

Related Books