हॅरी पॉटर आणि परीस (Marathi)

J. K. Rowling

Physical

Available

आपले मावशी-काका म्हणजेच डर्स्ली दाम्पत्य आणि त्यांच्या ढोल्या, दुष्ट डडली नावाच्या मुलासोबत राहून हॅरीनं आयुष्यभर दुःखच सहन केलेलं होतं. खोलीच्या नावाखाली हॅरीकडे होतं फक्त जिन्याखालचं एक लहानसं कपाट. अकरा वर्षांत कधीही त्याचा वाढदिवस कुणीही साजरा केलेला नव्हता. 

मात्र एके दिवशी एक महाकाय माणूस हॅरीच्या नावचं रहस्यमय पत्र घेऊन येतो.

त्यात हॅरीला एका अविश्वसनीय ठिकाणी येण्याचं आमंत्रण असतं. त्या ठिकाणी हॅरीची जादुई जगताशी पहिल्यांदा ओळख होते. तेथे गेल्यावर हॅरीला अनेक रहस्यमय गोष्टींचा उलगडा होतो. तेथे त्याला मित्र भेटतात, हवेतले खेळ खेळायला मिळतात, वर्गापासून ते जेवणापर्यंत प्रत्येक गोष्टीत जादू सापडते... आणि या सगळ्याबरोबर नाव मिळवण्याची एक फार मोठी संधी त्याला मिळते... जी त्याचीच वाट पाहत असते. अर्थात हॅरी संकटांमधून जिवानिशी वाचला, तरच तिचा उपयोग!

Language Marathi
ISBN-10 8186775978
ISBN-13 9788186775974
No of pages 290
Font Size Medium
Book Publisher Manjul
Published Date 01 Nov 2004

About Author

Author : J. K. Rowling

11 Books

Related Books