आपल्या जीवनाच्या प्रवासात, वेगवेगळ्या वळणावर अनेक व्यक्ती भेटतात काही योगायोगाने तर काही नियतीच्या इच्छेनुसार. मात्र आपल्या मनावर त्या कायमच्या कोरल्या जातात.
सुदैवाने मी एक डोळस आयुष्य जगल्यामुळे मनाच्या टिपकागदावर प्रत्येक अनुभव टिपत गेलो, त्यातूनच खूपसे शिकायला मिळाले आणि हृदयाच्या खोलवर एका कप्प्यात घडलेल्याचा संचय करत राहिलो. त्यातूनच कधीतरी; कुठेतरी घडलेले प्रसंग व प्रसंगातील परिचीत, अपरिचीत व्यक्तिरेखांनी माझा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला; ह्या पुस्तकाद्वारे आपणासमोर तेच आणण्याचा हा छोटासा प्रयत्न.
वाचकांना काही टप्प्यावर थोडेफार साधर्म्य आढळेल, कारण प्रत्येकजण काहीसे असेच अनुभवत असतो. माझ्या लेखणीतून ती स्मरणरंजने ललित अंगाने उतरली आहेत. जी तुम्हाला नक्कीच भावतील. - सतीश गुप्ते