आमची मुलं सगळंऽऽऽ खातात! (Marathi)

Neelanjana Singh

Digital

Available

या पुस्तकामध्ये ख्यातनाम आहारतज्ज्ञ नीलंजना सिंग यांनी मुलांच्या दृष्टीने उपयुक्त आणि त्यांच्या सर्वांगीण वाढीसाठी महत्त्वपूर्ण आहार नेमका कसा असावा, याविषयी सविस्तर विवेचन केले आहे. नीलंजना सिंग यांचा ‘उत्तम आरोग्यासाठी उत्तम आहार ही सर्वांसाठी उपयुक्त, अशी गुंतवणूक आहे,’ असा दृढविश्वास आहे.

आहाराविषयी मार्गदर्शन करताना विविध अन्नघटकांचे महत्त्व, जंकफूड्स, अन्नघटकांचे सुयोग्य प्रमाण राखण्याबाबतच्या सूचना, शिवाय साठवणूक आणि स्वच्छता अशा अनेक पैलूंना स्पर्श करत अतिशय ओघवत्या भाषेत समग्र स्पष्टीकरण मांडले आहे.

वेगवेगळ्या वयोगटांसाठी आहारतक्ते, आहारनियोजन, आणि पुस्तकाच्या उत्तरार्धात समाविष्ट असणार्‍या नावीन्यपूर्ण; परंतु अत्यंत आरोग्यदायी अशा पाककृती ही या पुस्तकाची वैशिष्ट्ये आहेत.

मुलांच्या आहाराविषयी अत्यंत मोलाचे मार्गदर्शन करणारे हे पुस्तक आपल्या पुस्तकसंग्रहात असायलाच हवे. पुस्तकातील पाककृती जेव्हा तुम्ही करून पाहाल, तेव्हा तुम्हीदेखील म्हणाल, ‘आमची मुलं सगळंऽऽऽ खातात!’

   
Language Marathi
ISBN-10 978-9386455352
ISBN-13 978-9386455352
No of pages 304
Book Publisher Vishwakarma Publications
Published Date 01 Jan 2018

About Author

Author : Neelanjana Singh

NA

Related Books