मुक्काम (Marathi)

Gauri Deshpande

Physical

Available

"बहुतांश लोकांनी ठरावीक मार्गाने वाटचाल करण्यात ज्यांचे भले असते अशांनी आखून दिलेल्या मार्गाने आपण आजवर का चालत आलो? आणि तेही त्याच्यात आपले फारसे भले दिसत नसताना? कुठलेही प्रश्न न विचारता पुढे जाणा-या आळशी अथवा अंध अथवा हतबल अथवा प्रवाहपतित जनांच्या ओघामागून आपण पावलापुढे पाऊल का टाकत राहिलो? काही रूढ कौटुंबिक वा सामाजिक संकेतांत ज्यांचे हितसंबंध गुंतले आहेत त्यांची हुकूमशाही का सहन करत आलो?..."

-हे प्रश्न अखंड आणि कर्कशपणे मनात निनादत असलेली कालिंदी, आजवर मुकाट काटली त्याव्यतिरिक्त दुसरी वाट शोधण्यासाठी शारीरिक आणि भौगोलिक दॄष्टया चाकोरीबाहेर पडते. तथाकथित नैतिकतेला, नातेसंकेतांना धक्के देत, जीवनाच्या मुक्त, प्राकॄतिक लयीशी लय साधत, भल्याबु-या अनुभवांना, खेदखंतींना सहज सामोरे जात, स्त्रीपुरुषसंबंधाचे नवनवे पैलू उलगडत-आकळत, मुंबई-तळेगाव-ग्रीस असा ’प्रवास’ करून परतते आणि आपले मुक्कामस्थळ पक्के करते.

कालिंदीच्या या ’मुक्कामा’ला केवळ शारीरिक वास्तव्याचा संदर्भ नसून वाहत्या-उसळत्या जीवनाला सदैव सन्मुख राहण्याच्या तिच्या ’स्वावलंबी’, निकोप जीवनदॄष्टीचा आहे! गौरी देशपांडे आपल्या कादंब-यांतून ज्या मुक्त पण विशुद्ध जीवनप्द्ध्तीचा सातत्याने शोध घेत आहेत, त्या त्यांच्या अखंड वाटचालीतीलच हा एक ’मुक्काम’!

Language Marathi
ISBN-10 8174867449
ISBN-13 9788174867445
No of pages 114
Font Size Medium
Book Publisher Mauj
Published Date 01 Jan 2012

About Author

Author : Gauri Deshpande

5 Books

Related Books