१०० छोट्या गोष्टी (Marathi)

Swami Vivekananda

Physical

Available

१०० छोट्या गोष्टी या पुस्तकात ज्ञान, भक्ती आणि मनोरंजन अशा छोट्या छोट्या १०० गोष्टी दिलेल्या आहेत. त्या लहानांनाच काय, पण मोठ्यानांही उद्बोधक ठरतील. त्या ज्ञानमय, भक्तियुक्त आणि मनोरंजनात्मक अशाच आहेत. अत्यंत सोप्या, सरळ, सुबोध भाषेत स्वामी विज्ञानानंद यांनी त्यांची मांडणी केली आहे. स्वामीजींच्या खास शैलीतील रोचक भाषेतील या कथा मुलांना अतिशय आवडतील, यात शंका नाही.

उत्तम संस्काराबरोबर त्यांच्या ज्ञानातही भर पडेल. शिवाय मनारंजनही होईल, हे वेगळेच. काही कथा भक्ती- रसाने परिपूर्ण आहेत. पालकांना आपल्या मुलांवर कोणते संस्कार करावेत, कसे करावेत असे कित्येकदा प्रश्न पडतात. हे प्रश्न हा कथासंग्रह निश्चितच सोडवेल. शिवाय जगातील १२ प्रमुख धर्मांची माहिती या ग्रंथात संकलीत केली आहे. तसेच मुलांच्या यश पराक्रमासाठी काय करता येईल, याची उद्बोधक माहितीही या ग्रंथात आहे.

त्याचा मुलांच्या यशाचा आलेख वाढण्यास निश्चितच उपयोग होईल. एकूण हे पुस्तक मुलांना अतिशय उपयुक्त ठरेल. तसेच पालकानांही मुलांच्या दुष्टीने ते उपयोगी ठरेल.

Language English
No of pages 96
Font Size Medium
Book Publisher New Way Sahity Granthmala

About Author

Author : Swami Vivekananda

4 Books

Related Books