शितू (Marathi)

G.N.Dandekar

Physical

In Circulation

“'गो.नी. दाण्डेकरांच्या कादंबरीलेखनात ‘शितू' (१९५३) एका मोक्याच्या वळणावर उभी आहे. त्यांना आपला खरा सूर  'शितू' पासून सापडला. 'मौजे' चे साक्षेपी संपादक श्री. पु. भागवतांशी झालेल्या संवादातून त्यांना आपली अशी साहित्यदृष्टी गवसली. 'शितू'ने लोकप्रियतेचं उदंड माप दाण्डेकरांच्या पदरात भरभरून घातलं.

‘शितू'तून व्यक्‍त होणारा केंद्रीय अनुभव प्रेमभावाचा आहे. सात्त्विक वृत्तीची पण दुदैवी बालविधवा शितू आणि बेदरकार वृत्तीचा पण अंतर्यामी प्रेमळ विसू यांच्या विफल प्रीतीची ही करुणोदात्त शोककथा आहे. कोकणातल्या खाडीकाठाच्या बहरत्या निसर्गाच्या साक्षीनं ही प्रीती उमलते, आणि त्याच खाडीत तिची अखेर होते.

दोन मनंप्रेमभावानं कशी जवळ येतात, उचंबळून जाणाऱ्या! प्रीतीन काठोकाठ कशी भरतात आणि संस्कारांच्या मनातल्या गाठींनी अंतराय आल्यावर आतल्या आत कशी दुभंगून जातात, त्याची ही कथा आहे.

'शितू'ची प्रकृती भावजीवी आहे. नाजुक संवेदनाक्षम वृत्तीच्या दोन जीवांच्या आंतरसंबंधांचा गोफ ती विणते. त्या भावात्मकतेतूनच काव्यात्मकताही निर्माण होते. भावोत्कट असा कुमारवयीन प्रेमानुभव हे 'शितू'चं खास वैशिष्ट्य आहे.' - डॉ. र. बा. मंचरकर (कादंबरीकार गो. नी. दाण्डेकरमधून.)

Language Marathi
ISBN-10 978-81-7486-848-0
ISBN-13 B06VVK247F
No of pages 137
Font Size Medium
Book Publisher Mauj Prakashan
Published Date 01 Jan 2016

About Author

Author : G.N.Dandekar

1 Books

Related Books