डोण्ट लूज युवर माइण्ड लूज युवर वेट (Marathi)

Rujuta Divekar trans.Prabha Dixit

Physical

In Circulation

केवळ वजन कमी करण्यासाठी वाचायला हवं असं नाही, तर तंदुरुस्त शरीर, संतुलित मन आणि अधिक अॅक्टिव्ह राहण्यासाठीचं बहुमोल मार्गदर्शक!

तुमचं डाएट- म्हणजे तुमचा आहार हा कसा तुम्ही आयुष्यभर जे आनंदानं खाऊ शकाल, त्याच्याशी जुळणारा असला पाहिजे. तुमच्या मूळ प्रकृतीशी, आवडी-निवडींशी, तुमच्या सवयींशी, कामाच्या स्वरूपाशी त्याचा मेळ साधला गेला पाहिजे. तसं झालं तरच तुमचं डाएट तुमच्या बाबतीत तुम्हाला हवा तो ‘चमत्कार’ घडवू शकतं. ‘डाएट’ करण्यामागे फक्त वजन कमी करणं एवढाच मर्यादित उद्देश ठेवणं योग्य नाही.

वजन- खरं तर चरबी- कमी करणं हा डाएटचा केवळ एकच चांगला परिणाम बहुतेकांना माहीत असतो; पण डाएट करण्याचे अन् त्या निमित्तानं आपली जीवनशैली बदलण्याचे अनेक फायदे असतात, हे त्यांना माहीत नसतं. ज्या डाएटचा उद्देश फक्त वजन कमी करणं हा असतो, ते डाएट फसलंच म्हणून समजा.

Language Marathi
ISBN-13 9788184000665
No of pages 279
Font Size Medium
Book Publisher ameya Prakeshan
Published Date 01 Jan 2009

About Author

या पुस्तकानं देशात धमाल उडवून दिली आहे. भारताची प्रख्यात क्रीडाशास्त्र आणि आहारतज्ञ तसचं करीना कपूरच्या फिट, कमनीय देहाची ‘शिल्पकार’ ऋजुता दिवेकरचं डाएटवरचं हे पहिलं पुस्तक – सामोसा, कबाब आणि गुलाबजामचा त्याग न करतासुद्धा वजन कसं कमी करावं हे शिकवणारं.

बस्, योग्य पधतीनं खाण्याची चतु:सूत्री अंगी बाणवायची. त्यानंतर सगळं काही खायचं, पण तरीही वजन उतरवायचं. नेमकं काय करायचं याबाबत मार्गदर्शन, आणि खूप वेगळा विचार देणारं, हलक्या फुलक्या प्रसंगांच्या कथनातून विषय स्पष्ट करणारं ‘डोण्ट लूज युवर माइण्ड, लूज युवर वेट’ हे पुस्तक अजिबात उपासमार होऊ ण देता डाएट कसं करायचं ते सांगतं.

Related Books