माणसे अरभाट आणि चिल्लर (Marathi)

G.A. kulkarni

Physical

In Circulation

अत्यंत विशाल असा अश्वत्थ वृक्ष गदागदा हलत आहे, व क्षणाक्षणाला त्यावरून पाने तुटून वाऱ्यावर भरकटत येऊन मातीत पडत आहेत. गडकरी यांच्या अंगणातील पिंपळाची मास्तरांनी आणलेली पाने उडालीच, पण खुद्द गडकरी गेले, व दातार मास्तर देखील गेले. रामलक्ष्मण, शिकंदर, व्यास, वाल्मिकी नाहीसे झाले, त्याप्रमाणेच दादा, आई, आजोबा ही पानेदेखील गेली.

टेक्सासमध्ये दूर कुठेतरी एक ओळखीचे पान आहे, पण तेदेखील फार दिवस टिकणार नाही. माझा देखील कधीतरी अश्वत्था शी असलेला संबंध तुटेल, आणि मातीच्या ओढीने मला खाली यावे लागेल. अश्वत्थाची सळसळ अखंड चालूच असते, आणि भिरभिरणाऱ्या पानांचे तरंगत खाली येणे हे कधी  थांबतच नाही.

प्रत्येक पान खाली उतरताना कदाचित 'समजत नाही, समजत नाही' असे म्हणत एक उच्छवास सोडत असेल. त्यांच्या उच्छवासामुळे वाऱ्याला सातत्य मिळते, त्याचा वेग जास्तच वाढतो व आणखी काही पाने खाली येतात व येताना म्हणतात ''समजत नाही, समजत नाही'' हेच ते साऱ्या बाबतचे अखेरचे शब्द असतील? आणि ते देखील समजत नाही.

Language Marathi
ISBN-10 818653086x
No of pages 136
Font Size Medium
Book Publisher Parchure Prakashan
Published Date 30 Nov -0001

About Author

Author : G.A. kulkarni

3 Books

Related Books