हाच माझा मार्ग (Marathi)

Sachin Pilgaonkar

Physical

Available

सचिनचे (सॉरी पण मित्रासारखा वाटतोस)आत्मकथन प्रकाशित झाल्यावर २ दिवसातच संपूर्ण वाचून काढले. काही माणसांना ते जन्माला आल्यावर कळालेलं असत कि आपल्याला काय करायचे आहे ते. त्यासाठी लागणाऱ्या मार्गदर्शनाची संधी ती व्यक्ती शोधत असते. प्रत्येक व्यक्तीकडून स्वतःच्या विकासासाठी लागणारे गुण शोधून स्वतःचा विकास कसा करावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे हे आत्मकथन .

सांस्कृतिक क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या व करणाऱ्या नवोदित कलाकारांसाठी व त्यांच्या परिवारालाही हे फार मार्गदर्शक ठरेल. या क्षेत्रात वावरणाऱ्या ज्येष्ठ सहाय्यक सह तसेच वयाने लहान असणाऱ्या कलाकारांशी कसे वागावे, नम्रता, कल्पकता, गुणग्राहकता, आत्मविश्वास, संयम, सतत्योद्योग, कौतुक, विनोद इत्यादी सचिनच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू अभ्यासण्यासारखे आहेत. या प्रचंड धावपळीतही प्रपंच उत्तम कसा करावा हे हि कळते. 

थोडक्यात काय तर पूर्ण स -चिन्मय (सचिनमय) असणारे हे आत्मकथन सचिनच्या मनाचा आरसा आहे . . सर्वांनी जरूर वाचावे, आम्ही तुझे ॠणी आहोत .. धन्यवाद (अमेय पाटकर-Kudal)

Language Marathi
ISBN-10 8184984618
ISBN-13 9788184984613
No of pages 311
Font Size Medium
Book Publisher Mehta Publishing house
Published Date 01 Jan 2013

About Author

Author : Sachin Pilgaonkar

1 Books

बालकलाकार मास्टर सचिन सहजसुंदर अभिनय करणारा हिरो... जबरदस्त परफॉर्मन्स देणारा. नवोदितांना आपुलकीने मार्गदर्शन करणारा महागुरू हिंदी चित्रपटसृष्टीत अभिमानाने मराठी मुद्रा उमटवणारा कलावंत. आजवर आपण सचिनला अभिनेता, दिग्दर्शक, पटकथाकार, नृत्यदिग्दर्शक, संकलक, निर्माता, गायक, संगीतकार, अशा भुमिकांमध्ये मोठया तसेच छोटया पडदयावर पाहिलं आहे.

Related Books