इस्लामी आघातावर हिंदूंचा प्रत्याघात (Marathi)

Dr. Sacchidanand Shevde

Physical

In Circulation

एक सहस्त्र वर्षांच्या इस्लामी आक्रमणाल तोंड देणाऱ्या हिंदू वीरांचे नावे विचारली तर आपली मजल, राणा प्रताप, गुरु गोविंदसिंग, छत्रपती शिवराय, शंभूराजे या पलीकडे जात नाही. त्यामुळे असा संघर्ष करणाऱ्या हिंदू वीरांची माहिती वाचकांना करून देण्यासाठी हा खटाटोप आहे. यात असे अनेक वीर सापडतील की ज्यांची नावे आणि त्यांचे कार्य आपल्यातील अनेकांना ठाऊक नसेल. थोडक्यात आक्रमकांनी बळकावलेल्या भूमी आणि भूमिपुत्रांबद्दलचा संघर्ष यात अधोरेखित केला आहे.

या क्रूर आक्रमकांनी केवळ तलवारीच्या जोरावरच येथे राज्य करायचा प्रयत्न केला. हिंदुस्थानच्या एका मोठ्या भूभागावर कित्येक शतके राज्य करुनही त्यांना आपले धर्म मत पटकन देता आले नाही. चर्चा, तर्क, वादविवाद, धार्मिक समजुती अथवा युक्तिवादाने देखील येथील बहुसंख्य हिंदू जनांना ते आपले धर्ममत पटवून देऊ शकले नाहित. त्यांनी धर्मांतरे घडवून आणली ती सुद्धा बलपूर्वक अथवा क्वचित अमिष दाखवून होय. या प्रदीर्घ काळात हिंदूनी आपल्या धर्मांच्या आचार- विचारांवर निष्ठा ठेवून सर्व प्रकारच्या अत्याचारांना अत्यंत धैर्याने तोंड देत आपला धर्म टिकवला.

असे जगात झालेले दिसत नाही. हेच आपले वैशिष्ट आहे. ज्या हिंदू वीरांनी त्या काळात आपल्या प्राणांची बाजी लावीत हलकल्लोळ केला त्यांचा इतिहास आज स्वराज्य मिळून सात दशके उलटली तरी आपल्याला ठाऊक नाही ही खेदाची बाब नव्हे काय?

Language Marathi
No of pages 248
Font Size Medium
Book Publisher Nav chatinya prakeshan
Published Date 30 Nov -0001

About Author

Author : Dr. Sacchidanand Shevde

1 Books

एक सहस्त्र वर्षांच्या संघर्षांची विजयगाथा

Related Books