चंद्रमुखी (Marathi)

Vishwas Patil

Physical

In Circulation

विश्वास पाटील यांची राजकारण आणि तमाशा कला यांची उत्तम सांगड घालणारी 'चंद्रमुखी' ही कादंबरी नुकतीच प्रकाशित झाली. आपल्या रूपाने आणि घुंगराच्या ठेक्याने अनेकांना मोहीत करणारी रूपवती आणि एका ध्येयधुरंधर राजकारण्याची ही शृंगारिक कथा पाटलांनी अतिशय प्रभावीपणे रेखाटली आहे. बॅ. खासदार दौलत देशमाने यशस्वी मराठा राजकारणी.

पंतप्रधान मॅडम सुचेता पंडित यांच्या खास मर्जीतील एक नेता- बुद्धिमान आणि चाणाक्ष नेता म्हणून राजकारणात खास दबदबा असलेला हा नेता चौफुल्यातील चंद्रमुखीच्या रूपावर आणि कलेवर फिदा होतो. चंद्रमुखीही त्याला दिलाचा दरबार मानते. तमाशा जीवनात अडकलेली ही लावणीसम्राज्ञी आणि राजकारणाच्या चौकटीत उभा असलेला महत्त्वाकांक्षी नेता या दोघांच्याही मिलनाची ही शृंगारिक कहाणी अनेक सामाजिक, राजकीय आणि कौटुंबिक प्रश्नांची समीक्षा करताना दिसते.

दौलतराव - एक ध्येयधुरंधर राजकारणी. आपला ’संसार’ सांभाळत लोककलेची कदर करणारा रसिक. ती - चंद्रमुखी! नावाप्रमाणेच देखणी. तमाशातली शुक्राची चांदणी. नृत्यकौशल्य, सौंदर्याबरोबरच ’बाई’पणाचा शाप घेऊन आलेली कलावंतीण. मग ’लाल दिवा’ आणि ’घुंघरा’च्या गुंतावळीतून निर्माण झाली ही रशिली कहाणी.

Language Marathi
ISBN-10 8174342907
ISBN-13 9788174342904
No of pages 315
Font Size Medium
Book Publisher rajhans prakashan
Published Date 01 Aug 2004

About Author

Author : Vishwas Patil

8 Books

तो ध्येयधुरंधर राजकारणी, ती तमाशातली शुक्राची चांदणी.लाल दिवा आणि घुंगरांच्या गुंतवळीची ही रशीली कहाणी.

Related Books