डॉ. मनमोहनसिंग - एक वादळी पर्व (Marathi)

Sujay Shastri

Physical

In Circulation

नरसिंह राव सरकारात १९९१ साली डॉ. मनमोहनसिंग यांची अर्थमंत्री म्हणून झालेली निवड अनपेक्षित ठरली. मात्र त्यानंतर त्यांनी केलेल्या आर्थिक सुधारणा आणि उदारीकरणाची धरलेली कास यामुळे आर्थिक अरिष्टातून देश सावरला. जनतेच्याच नाही तर माध्यमांच्या लेखी ही ते नव्या अर्थनीतीचे शिल्पकार म्हणून गौरवले गेले. पुढे, २००४ साली तितक्याच अनपेक्षितपणे डॉ. मनमोहनसिंग यांची पंतप्रधानपदासाठी निवड झाली. त्या दरम्यानच्या राजवटींनी त्यांची धोरणेच पुढे चालवली होती. दोनदा प्रंतप्रधानपद नाकारून सोनिया गांधी यांनी टाकलेली जबाबदारी ते पार पाडत होते...

... आणि त्यांच्या विरोधात काहूर माजू लागले. विविध घोटाळ्यांचे भांडवल उभारून त्यांना बदनाम करायला सुरुवात झाली. न बोलणारा कमकुवत पंतप्रधान अशी अजब बडबड विरोधक करु लागले. अण्णा हजारे, केजरीवाल यांच्या आंदोलनांनी देश ढवळला. माध्यमांनीही त्याला खतपाणी घातले. यामागे नेमके काय होते? डॉ. मनमोहनसिंग यांच्या त्या दहा वर्षांच्या वादळी कारकिर्दीचा हा पट....

Language Marathi
ISBN-10 9380092989
ISBN-13 9789380092980
No of pages 346
Font Size Medium
Book Publisher Granthali Prakashan
Published Date 01 Jul 2014

About Author

Author : Sujay Shastri

NA

Related Books