शनिमहिमा (Marathi)

Vasudha Wagh

Physical

In Circulation

नवग्रहांपैकी शनी ग्रहाची फळं ज्योतिषशास्त्रात अतिशय तीव्र स्वरूपाची म्हणून मानली जातात. शनी आणि साडेसाती, शनीचा गर्का याची एक भीती सर्वसामान्यांचा मनात असते. परंतु ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करताना मला जाणवत गेलं की वाटतो तितका शनी क्रूर नाही. उलट माझ्या मते शनी हा सद्सद्विवेक बुद्धीचा प्रतीक आहे. तुमच्या चांगल्या किंवा वाईट कर्मांची कर्मफलं तो निरपेक्ष आणि तटस्थ बुद्धीने देत असतो. सजग न्यायाधिशाची भूमिका शनी कायम बजावत असतो. 

'सांगू एकदा सांगू दोनदा! न करी जो गुमान अमुचे शब्दा ||
त्या मग पोटचे पोरासुद्धा | चिरुनि द्विधा फेंकू कीं ||
साईसच्चरित अध्याय १९ ओवी २३२

हीच शनीची भूमिका असते. शनी आपल्याला जीवनात इशारे देण्याचे कार्य करतो की चांगल्या कर्माची फळं ही चांगलीच मिळतात आणि वाईट कर्माची फळं ही अंतिमत: वाईटच मिळतात.

Language Marathi
No of pages 178
Font Size Medium
Book Publisher Navachaitanya Prakashan

About Author

Author : Vasudha Wagh

1 Books

Related Books