मनात (Marathi)

Achyut Godbole

Physical

In Circulation

पाश्चात्य ज्ञानशाखांची ओळख मराठीत करून देण्याच्या अच्युतच्या प्रचंड प्रकल्पातील हे नवे पुस्तक. ’मनात’चे मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ या मधल्या पाचशे - सहाशे पानांतून घरबसल्या मेंदू आणि मानस या विश्वाची विमानयात्रा घडेल. याहून स्वस्त एअरलाईन उपलब्ध नाही. - डॉ. अभय बंग असंख्य वाचकांना मंत्रमुग्ध करून सोडेल अशी मानसशास्त्राची रंजक कहाणी सामाजिक कार्यकर्ते, समुपदेशक, विद्यार्थी, शिक्षक अशा सर्वांना प्रचंड उपयुक्त ठरेल. - डॉ. प्रकाश आमटे ’मनात’ - व्यापक अर्थानं माहिती देणारं अच्युतचं हे पुस्तक म्हणजे कुतूहल असणार्‍या प्रत्येक वाचकासाठी भरभरून असा खजिनाच आहे. - डॉ. रवी बापट व्यापक,

अभ्यासपूर्ण, विषयाची संपूर्ण ओळख करून देणारं, अतिशय पायाभूत माहिती असलेलं मानसशास्त्रावरचं अच्युतचं हे नव पुस्तक ’मनात’ फॅसिनेटिंग आहे. - डॉ मोहन आगाशे ’मनात’ मराठीत तर सोडाच पण भारतात लिहिल्या गेलेल्या मानसशास्त्राच्या कोणत्याही पुस्तकात सापडणार नाही इतका विस्तृत तपशील लालित्यपूर्ण शैलीतून मांडला आहे. - प्रा. एम. एन. पलसाने श्री. अच्युत गोडबोले यांचा ’मनात’ हा ग्रंथराज म्हणजे चौकस वाचकांना मानसशास्त्राच्या प्रमुख अंगाचा परिचय करून देणारे बौध्दिक खाद्य ठरु शकेल - प्रा. डॉ. भरत देसाई देव आणि दानव यांनी समुद्रमंथन करून ज्याप्रमाणे अमृत बाहेर काढलं त्याचप्रमाणे वैचारिक मंथन करून मानसशास्त्रासारखा कठीण विषयसुध्दा श्री. गोडबोले यांनी अत्यंत सोप्या शब्दात वाचकासमोर मांडला आहे .

यामागे त्यांचं प्रदीर्घ वाचन आणि तपश्चर्या निश्चितच दिसून येते ! - डॉ. सुधाकर देशपांडे इंग्रजीमध्ये विल ड्युरान्तच्या ’स्टोरी ऑफ फिलॉसॉफी’ या पुस्तकाचे जे अढळ स्थान आहे ते ’मनात’ या पुस्तकाला मराठीत मिळणार आहे हे निश्चित ! - डॉ. आनंद नाडकर्णी ’मनात’ या पुस्तकातला प्रत्येक शब्द विषयाचं मर्म उलगडून सांगत वाचकांशी सहज दोस्ती करणारा आहे. केवळ अच्युतच ते लिहू जाणे...! - डॉ. राजेंद्र बर्वे मानसशास्त्रावरचं ’मनात’ हे अच्युतनं लिहिलेलं पुस्तक वाचलं आणि त्यांच्या उत्तुंग आणि अचाट प्रतिभेची प्रचिती आली. हे पुस्तक नक्कीच एक इतिहास घडवणार यात शंकाच नाही! - डॉ. प्रदीप पाटकर

Language Marathi
ISBN-10 9385266284
ISBN-13 9789385266287
No of pages 589
Font Size Medium
Book Publisher manovikas prakashan
Published Date 01 Jan 2012

About Author

Author : Achyut Godbole

6 Books

मानसशास्त्राची उत्कंठावर्धक रम्य सफर

Related Books