प्रतीक्षा (Marathi)

Ranjeet Desai

Physical

In Circulation

प्रतीक्षा' ही कादंबरी रणजित देसाईंच्या मृत्यूनंतर दोन वर्षांनी प्रकाशित झाली. पुनर्लेखनासाठी देसाईंनी ती बाजूला ठेवून दिली होती. परंतू पुनर्लेखन होवू शकले नाही. या कादंबरीत एक भावपूर्ण प्रेमकहाणी चित्रित झालेली असून यातील वातावरण आध्यात्मिक स्वरूपाचे आहे. संपूर्ण कथानक हिमालयाच्या परिसरात घडते. कादंबरीचा नायक अतृत्प आणि असफल प्रेमजीवनातून आलेल्या निराशेपोटी भटकत असतो.

खर्‍या प्रेमासाठी फिरत फिरत हिमालयात येतो आणि येथेच त्याची नायिकेशी गाठ पडते. नायक अतिशय हलक्या व भावपूर्ण अंत:करणाचा आहे. तर नायिका सुंदर, सत्वशील, प्रमळ, संयमी कर्तव्यदक्ष आणि विचारी आहे. अतिशय अलगदपणे या दोघांमधील भावबंध विणले जातात. ती हळूहळू घट्ट होणारी वीण वाचकाला मंत्रमुग्ध करते. प्रेमाचा संयमित आविष्कार हा अधिक शृंगारिक असतो याचा प्रत्यय ही कादंबरी वाचताना येतो.

बाबांच्या व्यक्तिरेखेतून पाप, पुण्य, प्रेम जीवन परमेश्‍वर इत्यादी विषयांची वेगळी पण ठाम मते वाचकांपुढे येतात. कथेला आणि व्यक्तीरेखनाला पुष्टी देणारे विचार म्हणून कादंबरीत त्याला विशेष स्थान आहे. कादंबरीतील वातावरण निर्मिती ही लक्षणीय आहे. निसर्गवर्णनाबरोबरच लोकजीवनाचेही चित्रण येथे आढळते. एखाद्या चित्रपटात शोभेल अशा प्रकारचे रहस्यपूर्ण कथानक रंगवून लेखकाने ही छोटेखानी कादंबरी वाचकांच्या मनाला भिडवण्याचा प्रयत्न केला आहे.

Language Marathi
ISBN-10 8177663348
ISBN-13 9788177663341
No of pages 107
Font Size Medium
Book Publisher Mehta Publishing house
Published Date 01 Jan 1994

About Author

Author : Ranjeet Desai

19 Books
  • ‘पाहिलंस, मिलिंद, माणूस अंतर्मुख होण्याला केवढा भितो, ते? दुसर्‍याच्या दु:खाकडे तो निर्विकारपणे पाहू शकतो. त्याच्या दु:खाची छाननी करू शकतो; पण स्वत:चं परीक्षण करताना मात्र तो व्याकूळ होतो. दुसर्‍याच्या जखमेवरची पट्टी दूर करण्याच्या कल्पनेनंही तो कासावीस होतो... ‘याचं कारण? ‘कारण एकच... जीवनावरची अश्रध्दा.
  • जीवन जगण्यात असलेला प्रामाणिकपणाचा अभाव. सारेच व्यवहार स्वार्थप्रेरित. मानव एकटाच जन्माला येतो आणि त्याला शेवटी एकटंच जावं लागतं, तरीही त्याला आयुष्यभर सोबतीची आवश्यकता असते.
  • ही सोबत तो शोधीत असतो. आयुष्य क्षणभंगुर आहे, हे माहीत असूनही, चिरंतन, शाश्र्वत प्रेमाचं ठिकाण त्याला हवं असतं; पण हे सारं स्वत:ला सुरक्षित राखून... ‘दिल्याखेरीज काहीच मिळू शकत नाही. स्वत: हरवल्याखेरीज काही गवसत नाही. हे हरवणं जो शिकला, त्यालाच ती शांती, ते समाधान मिळू शकेल. मात्र ते ठिकाण प्रत्येकानं शोधायला हवं...’

Related Books