टाइमलाइन (Marathi)

Dr. Pramod Jogalekar , Michael Crichton

Physical

In Circulation

एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर क्वांटम भौतिकी संशोधनाने आजवर कोणीही कल्पना न केलेले विश्‍व उभे केले आहे. आजपर्यंत काळाची मर्यादा मानव कधी पार करू शकला नाही. पण क्वांटम तंत्रज्ञानावर आधारित महासंगणकामुळे कोणत्याही तार किंवा तत्सम माध्यमाशिवाय एका बिंदूपासून दुसर्‍या बिंदूपर्यंत माहितीचे तात्काळ संक्रमण होते आणि भूतकाळातील कोणतीही घटना वास्तवात आणता येते !

त्यामुळे भूतकाळ, वर्तमानकाळ व भविष्यकाळ ही विभागणीच होवू शकत नाही ! एकाच वेळी अनेक विश्‍व अस्तित्वात आहेत व या विश्‍वात तीनही काळात आपण प्रवास करू शकतो ! काही पुरातत्व संशोधक चौदाव्या शतकातील फ्रान्समध्ये प्रवेश करतात. आणि सुरू होते मध्ययुगातील क्रौर्याशी थरकाप उडवणारी झुंज आणि... मेंदूला मुंग्या आणणारी कादंबरी..... टाइमलाइन....

Language Marathi
ISBN-10 8177664336
No of pages 521
Font Size Medium
Book Publisher Mehta Publishing house
Published Date 01 Jan 2004

About Author

Related Books