आँधी गुलजार (Marathi)

Vijay Padalkar

Physical

In Circulation

“आंधी' चित्रपटाची पटकथा फार मजेदार परिस्थितीत लिहिली गेली. मी 'ऑधी'ची पटकथा लिहीत होतो, तेव्हा कमलेश्वरांबरोबर दुसराच एक चित्रपट निर्माण करण्याची बैठक झाली. पुढे तो चित्रपट 'मौसम' या नावाने प्रदर्शित झाला. बैठका ह्या चित्रपटासाठी व्हायच्या आणि चर्चा सहज दुसऱ्या चित्रपटाकडे वळायची.

हळूहळू आम्ही दोन्ही चित्रपटांची एकदमच चर्चा करू लागलो. शेवटी हे ठरले की कमलेश्वरांनी या कथा-कल्पनांवर आपल्या पद्धतीने कादंबर्‍या व मी माझ्या पद्धतीने पटकथा लिहायच्या. त्यांच्या कादंबऱ्यांतून मला काही मुद्दे मिळतील, माझ्या 'पटकथातून त्यांना काही गोष्टी !

Language Marathi
No of pages 99
Font Size Medium
Book Publisher Shubhad Publication

About Author

Author : Vijay Padalkar

1 Books

श्रेष्ठ चित्रपट दिग्दर्शक गुलजार यांचा कथासंग्रह 'रावीपार'च्या अनुवादाच्या निमित्ताने व अरुण शेवते यांच्या मैत्रीमुळे गुलजार यांची भेट झाली. ही एका सुंदर नात्याची सुरुवात होती. नंतर त्यांच्या सर्व चित्रपटांवर एक पुस्तक लिहिण्यासाठी आम्ही अनेकवार भेटलो. या दरम्यान एकदा 'आँधी'चा विषय निघाला असता गुलजारांनी या चित्रपटाच्या पटकथेचे पुस्तक हिंदीत प्रकाशित झाल्याचे सांगितले.

त्याचवेळी केव्हातरी या पटकथेचा अनुवाद मराठीत करण्याचे बीज मनात पडले. त्याला अरुण शेवतेंनी खतपाणी घातले. इतकेच नव्हे तर ते पुस्तक मुंबईतून मला पाठवून दिले. गुलजारांनीही प्रेमाने या भाषांतरास परवानगी दिली, याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. गुलजारांवर प्रेम करणार्‍या रसिकांना आणि चित्रपटकथेच्या अभ्यासकांनाही हे पुस्तक मोलाचे वाटेल याची मला खात्री आहे.

Related Books