आवडलेली माणसे (Marathi)

Vidyadhar Pundalik

Physical

In Circulation

१९७०- ८० च्या दशकातील गाजलेला निराज्य वाड्.मय पुरस्काराने सन्मानित असा विद्याधर पुंडलिकांचा हा व्यक्तिचित्रसंग्रह. आपल्याला अतीव आवडलेल्या नि त्यांच्या व्यक्तित्वाने अंतर्बाह्य प्रभावित झालेल्या अशा साहित्य- समाज-क्षेत्रांतील अकरा व्यक्तिवर पुंडलिकांनी यात लिहिले आहे.

कथाकार पुंडलिकांच्या सूक्ष्म कथांप्रमाणेच या संग्रहातील त्यांचे प्रत्येक व्यक्तिचित्र कलात्मक अशी स्वतंत्र सर्जनशील कलाकृतीच आहे हे जाणवत राहते. पुंडलिक प्रत्येक व्यक्तीला केवळ आरपार न्याहाळत नाहीत, तर तिचे व्यक्तित्व- त्यातले नेमके मर्म चिमटीत पकडून त्या त्या व्यक्तीला सक्ष्म निरक्षणातून वाचकांसमोर जीवंत साकार करतात.

पुंडलिकांना ही सगळी माणसे भावली असली तरी त्या त्या व्यक्तीचा तितक्याच अलिप्तपणे शोध घेण्याची तटस्थताही त्यांच्या लेखनातून सामोरी येते. कधी देहबोलीतून, कधी भाषिक लकबीतून, तर कधी अगदी छोट्याशा प्रसंगातून पुंडलिक प्रत्येक व्यक्तिचा वेध आत्यांतिक उत्कटतेने, जातिवंत रसिकतेने, आणि तितक्याच तीव्र संवेदनशीलतेने घेताना दिसतात.

 

Language Marathi
ISBN-10 9350910853
ISBN-13 9789350910856
No of pages 124
Font Size Medium
Book Publisher Mauj
Published Date 01 Jan 2014

About Author

Author : Vidyadhar Pundalik

1 Books

Related Books