करुणाष्टक (Marathi)

Vyankatesh Madgulkar

Physical

In Circulation

ही आहे एक कुटुंबकहाणी... दादा, आई, सहा मुलं आणि दोन मुली यांची. आईचा कडक स्वभाव आणि फाडफाड बोलणं यामुळे दादा तिला म्हणायचे ‘फौजदार’. पण सगळ्या कुटुंबाला सावली देणारं घर जळलं; दादा खचले, वारले आणि आई अबोल झाली. स्वत:च्या संसारात अलिप्तासारखी वागू लागली. मुलं मोठी होत होती. या मुलांच्या रूपानं आईपुढे आठ समस्या उभ्या राहिल्या.

जणू ही आठ मुलं म्हणजे नियतीनं आईला घालून ठेवलेली आठ कोडी. हेच तिचं करुणाष्टक. खरं म्हणजे कोणत्याही आईचं. कारण, वाट चालताना ओझं वागवणं हे स्त्रीच्या भाळी अगदी इतिहासपूर्व काळापासून आलेलं आहे. तेव्हापासून आपल्या स्त्रीत्वाला आलेलं फळ-मूल हे सुध्दा आईला ओझंच होऊन राहिलं असलं पाहिजे.

Language Marathi
ISBN-10 8184983751
ISBN-13 9788184983753
No of pages 128
Font Size Medium
Book Publisher Mehta Publishing house
Published Date 01 Jan 1982

About Author

Author : Vyankatesh Madgulkar

9 Books

Related Books