झोत (Marathi)

Shekhar Patil

Physical

Available

या कथा वाचकांच्या हाती देताना मला फार आनंद होत आहे. ही माणसं मला कुठे भेटली? ती एक मजेशीर गंमतच आहे.

कोकणात रायगड जिल्ह्यातील चिखली या गावी माझ्या वडिलांचं किराणा मालाचं छोटसं दुकान होतं. दुपारच्या वेळी शिळोप्याच्या गप्पा मारण्यासाठी ही मंडळी दुकानात येऊन बसायची, आणि मग तिथेच बारा गावच्या बारा भानगडी रंगायच्या. त्या रंगलेल्या गोष्टी दुकानाच्या एखाद्या कोपऱ्यात बसून मी ऐकायचो.
ती गोष्टी वेल्हाळ भली माणसं मी पाहिली. त्यांच्या तोंडून ऐकलेल्या कोकणातल्या थंडी वाऱ्याच्या, पाऊसपाण्याच्या, सुखदु:खाच्या, पेंढ्याच्या मांडवाखाली  रंगलेल्या प्रणयाच्या, प्रेमाच्या या गोष्टी वाचकांना सांगण्याचा हा प्रयत्न.

या कथापैकी 'तोल' ही कथा भामोली ठाकूर वाडीच्या एका ठाकराच्या तोंडून मी ऐकली.
 

Language Marathi
ISBN-13 B079TMKSVK
No of pages 240
Font Size Medium
Book Publisher Manorama Prakashan
Published Date 01 Jan 2018

About Author

Author : Shekhar Patil

1 Books

Related Books