नटसम्राट (Marathi)

V. V. Shirwadkar

Physical

Available

'नटसम्राट' या नाटकाने प्रत्येक मराठी नाट्यरसिकाच्या मनात घर केले आहे. शेक्सपियरच्या 'किंग लियर' ने शिरवाडकरांच्या लेखनाला चालना दिली असली तरी त्यानंतर त्यांच्या प्रतिभेने झेप घेऊन ह्या नाटकाला अत्यंत जीवघेणी आर्तता दिली आहे. त्यातील गणपतराव बेलवरकर ह्या वृद्ध नटाचे आणि त्यांचे 'सरकार' कावेरी यांचे व्यक्तिचित्रण अनेक कलावंतांना मोह पडणारे आहे आणि गेल्या चाळीस वर्षात अनेकांनी ते जिद्दीने रंगभूमीवर आणले आहे.

साहित्य अकादेमी पुरस्कार मिळालेले हे एकुलते एक नाटक. 'मराठीतील सर्वांत वाचले, अभ्यासले गेलेले नाटक', असे याचे वर्णन केल्यास ते अतिशयोक्त ठरू नये. ह्या नाटकाची ध्वनिफीत, चित्रफीत ह्याही लोकप्रिय ठरल्या आहेत.

'नटसम्राट' ची मोहिनी फक्त मराठी वाचकांनाच वाटलेली नाही त्यामुळेच ह्या नाटकाचे अनेक भाषांतून अनुवाद प्रसिद्ध झाले आहेत. मराठीतही अनेक वेळा मुद्रित झालेल्या नाटकाची ही 'शिरवाडकर जन्म शताब्दी विशेष' आवृत्ती. यात पहिले नटसम्राट श्रीराम लागू यांच्या दोन लेखांचा समावेश करण्यात आला आहे.

Language Marathi
ISBN-10 817185723X
ISBN-13 9788171857234
No of pages 111
Font Size Medium
Book Publisher Popular Prakashan
Published Date 01 Jan 2013

About Author

Author : V. V. Shirwadkar

2 Books

Related Books