नांगरणी (Marathi)

Anand Yadav

Physical

In Circulation

कणखर सकसता आणण्यासाठी भूमीनं स्वत:वर धारदार अवजारांनी आडवे उभे घाव घालून घेणे आणि सूर्यभट्टीत अंतर्बाह्य होरपळणे म्हणजे नांगरणी. उत्तम पिकांच्या समृद्धीसाठी शेतमळ्यांवर हिरवीगार साय साकळावी; अंगाखांद्यावरच्या गाईगुरांना, माणसाकाणसांना, किड्यामुंग्यांना, चिमण्यापाखरांच्या इवल्या चोचींना मूठमूठ-चिमूटचिमूट चारचणा मिळावा; म्हणून भूमीनं स्वत:ची सोशिकपणे केलेली उरस्फोड म्हणजे नांगरणी.

इच्छाआकांक्षाची पूर्तता करणारा पाऊस कृपावंत होऊन पडावा म्हणून तहानलेल्या पृथ्वीनं वासलेली चोच म्हणजे नांगरणी. नांगरणी म्हणजे हिरव्या चैतन्याला जन्म देऊ पाहणाऱ्या सर्जनोत्सुक भूमीची घुसमटणारी निर्मितिपूर्व करुणावस्था.

Language Marathi
ISBN-10 8177665170
ISBN-13 9788177665178
No of pages 344
Font Size Medium
Book Publisher Mehta Publishing house
Published Date 01 Jan 1990

About Author

Author : Anand Yadav

4 Books

Related Books