महाश्वेता. (Marathi)

Sudha Murty

Physical

In Circulation

ती अनुपम लावण्यवती, गरीब शाळामास्तरांची मुलगी. तो एक देखणा डॉक्टर - घरंदाज, लक्ष्मीपुत्र. सर्वांच्या मर्जीविरुध्द त्यानं तिच्याशी लग्न केलं. परंतु दुर्दैवानं काही महिन्यांतच तिच्या अंगावर कोडाचा पांढरा डाग उमटला आणि सार्‍या घरादारानं त्या अभद्राला घाबरून, किळसून तिला माहेरी हाकलून लावलं - कचराकुंडीत घाण फेकावी, तसं! ...

पुढे तिनंही आपलं स्वतंत्र अवकाश उभारलं. मात्र काही काळानं तो आतल्या आत तडफडू लागला - ‘तिच्याऎवजी आपल्याला कोड फुटलं असतं, तर तिनं आपल्याला असंच टाकून दिलं असतं का?...’ काय असते या वास्तवातली तडफड?... काय असू शकतो अशा गोष्टींचा शेवट?... कन्नड साहित्यातील श्रेष्ठ लेखिका सुधा मूर्ती यांनी या कादंबरीत पारंपारिक वातावरणातून आलेल्या व आयुष्य उद्‍ध्वस्त करणार्‍या संकटांनी घेरलेल्या तरुणीला वास्तवाचं यथोचित भान देऊन, स्व:तच्या आयुष्याला समर्थपणे आकार देण्याइतकं सक्षम केलं आहे.

लेखिकेचे प्रगल्भ विचार व आधुनिक जीवनाशी समन्वय साधणारी दृष्टी, यामुळे या कादंबरीला गहनता प्राप्त झाली आहे. अनेक भारतीय भाषांत अनुवादित झालेल्या या कादंबरीचा हा उत्कृष्ट मराठी अनुवाद वाचकांना चटका लावेल व विचारास प्रवृत्त करेल.

Language Marathi
ISBN-10 8177663089
ISBN-13 9788177663082
No of pages 152
Font Size Medium
Book Publisher Mehta Publishing
Published Date 01 Jan 2002

About Author

Author : Sudha Murty

34 Books

Related Books