घरोघरी ज्ञानेश्वर जन्मती (Marathi)

Dr. H. V. Sardesai

Physical

In Circulation

आपला समाज मुलांचं कौतुक खूप करतो. उदाहरणार्थ, 'मुलं म्हणजे फुलं', 'बालादपि सुभाषितं ग्राह्यम' 'मुलं हे राष्ट्राचे उद्याचे आधारस्तंभ' वगैरे. प्रत्यक्षात मात्र 'मुलं वाढवणं' या संबंधीचा मुलभूत विचार करण्याची गरज कितीशी ओळखली जाते? मुलं होतात आणि वाढत जातात. मुलांना जन्म देणं तरी एकवेळ सोपं, पण त्यांना संपन्न व्यक्तिमत्वाची माणसं होण्यासाठी संधी आणि वातावरण देणं फार फार कठीण आहे.

कारण यासाठी मुलं वाढवणं म्हणजे नेमकं काय याची माहिती पालकांनाच असायला हवी आणि तीच तर बहुतेक पालकांजवळ नसते. मूल लहानाचं मोठं करणं म्हणजे आनंद, जबाबदारी एवढं बहुतेकांना कळतं. पण ही जबाबदारी पेलण्यासाठी स्वतःलाही कष्ट घ्यावे लागतात याची जाणीव अनेकदा नसते. याबाबतच विधायक मार्गदर्शन या पुस्तकातून पालकांना मिळू शकेल.

Language Marathi
No of pages 162
Font Size Medium
Book Publisher Utkarshya Prakeshan
Published Date 01 Jan 2008

About Author

Author : Dr. H. V. Sardesai

NA

Related Books