द लिव्ह वेल डाएट (Marathi)

Dr. Sarita Davare

Physical

Available

द लिव्ह वेल डाएट' ही जीवनशैली आहे. अधिक चांगलं जगण्याची गुरुकिल्ली. ज्यांच्या दृष्टीने निरोगी, सुडौल आणि चैतन्यपूर्ण असणं अपरिहार्य आहे त्यांच्यासाठी हे पुस्तक महत्त्वाचे आहे. 'द लिव्ह वेल डाएट' हे पुस्तक डाएटविषयीचे सगळे गैरसमज निश्चितपणे दूर करेल कारण हे पुस्तक योग्य आणि अयोग्य खाण्यातला फरक नेमका समजावून सांगतेच पण त्याहूनही जास्त निरोगी आणि आनंदी जगण्याविषयी सांगते.

डॉ. डावरे यांनी अनुभवातून सांगितलेले सोपे, व्यवहार्य आणि लवचिक डाएट आणि व्यायामाचे योग्य तंत्र यांच्या साथीने मास्टर शेफ संजीव कपूर यांनी पारखलेले अतिशय चविष्ट आणि तरीही पौष्टिक, कमी केलरीचे पदार्थ ही या पुस्तकाची महत्वाची वैशिष्ट्ये आहेत. सोप्या, स्वादिष्ट, पोषक, झटपट आणि सहज उपलब्ध होणाऱ्या सामग्रीपासून बनणाऱ्या या पाककृती आहेत.

Language Marathi
ISBN-10 8171854974
ISBN-13 9788171854974
No of pages 359
Font Size Medium
Book Publisher Popular Prakashan
Published Date 01 Jan 2014

About Author

Author : Dr. Sarita Davare

1 Books

उत्तम आरोग्य आणि वजन नियोजन यांविषयीचं योग्य मार्गदर्शन

Related Books