नाटकांमागील नाट्य (Marathi)

Lalan Sarang

Physical

Available

‘रथचक्र’, ‘सखाराम बाईंडर’ या नाटकांमधील भूमिकांमुळे लालन सारंग यांचे नाव नाट्यसृष्टीत अजरामर झाले. त्यांनी व त्यांचे पती कमलाकर सारंग यांनी नाट्य संस्था स्थापन केल्या. अनेक नाटकांची निर्मिती त्यांनी केली. या काळात त्यांना अनेक अडचणी आल्या, अनेक अनुभव गाठीशी आले. लालन सारंग यांनी ‘नाटकांमागील नाट्य’मधून ते रसिकांसमोर मांडले आहेत. नाट्य व्यवसायात त्यांनी जे अनुभवले, जे घडले ते त्यांनी प्रामाणिकपणे मांडले आहेत. त्यांच्या ‘नाट्यमय’ अनुभवातून वाचकांनाही नाटकामागील नाट्य समजते.

‘रथचक्र’मधील ‘ती’, ‘सखाराम बाईंडर’ मधील ‘चंपा’, ‘घरटे अमुचे छान’मधील ‘विमल’, ‘कमला’ मधील पत्रकार-पत्नी ‘सरिता’, ‘खोल खोल पाणी’मधील ‘चंद्रक्का’, ‘सूर्यास्त’मधील वृद्ध ‘जनाई’... आपल्या अनुभव-समृद्ध कारकीर्दीत लालन सारंग यांनी यासारख्या बहुविध भूमिका रंगमंचावर साकार केल्या, जिवंत केल्या, त्याद्वारे प्रेक्षकांशी नातं जोडलं आणि नाटयक्षेत्रांत आपला विशेष ठसा उमटविला. या सर्व नाटयप्रवासात त्या केवळ कलावंत म्हणून नाही, तर कमलाकर सारंग यांच्यासह सहनिर्माती म्हणूनही सक्रिय होत्या. या प्रवासात विजय तेंडुलकर, श्री.ना.पेंडसे, जयवंत दळवी, रत्नाकर मतकरी यासारखे प्रज्ञावंत नाटककार व त्याचप्रमाणे निळू फुले, दत्ता भट, श्रीकांत मोघे, मोहन आगाशे, रोहिणी हट्टंगडी, सुलभा देशपांडे, प्रिया तेंडुलकर, जयराम हर्डीकर यासारख्या मान्यवर कलावंतांसोबत त्यांचा सुसंवाद राहिला.

नाटककारांशी सुसंवाद साधताना, सहकलाकारांशी ताळमेळ साधताना ... भूमिका समजून घेताना किंवा व्यक्तिरेखा रंगमंचावर साकार करताना ... नाटकाच्या शुभारंभाच्या वेळी किंवा नाटक ‘बंद’ पडल्यावर ... नाटकावर टीकास्त्र सुटली असताना किंवा त्यावर कौतुकाचा वर्षाव होत असताना ... तालमी होत असताना, प्रयोग सादर होत असताना ... नाटकांच्या दौर्‍यासाठी प्रवास करताना... अशा विविध प्रसंगी लालन सारंग यांना त्यांच्या कारकीर्दीत अनेक कडु-गोड अनुभव आले. लालन सारंग यांच्या अशा ‘नाटयमय’ अनुभवांचं संचित म्हणजेच नाटकांमागील नाटय!

Language Marathi
No of pages 179
Font Size Medium
Book Publisher rohan Prakashan
Published Date 01 Jan 2007

About Author

Author : Lalan Sarang

1 Books

रोखठोक व सहज - संवादी शैलीतील नाट्यमय अनुभवकथन

Related Books