रानफुले (Marathi)

V. S. Khandekar

Physical

Available

 

‘रानफुले’ हा वि. स. खांडेकरांनी सन १९२७ ते १९६१ या कालखंडात लिहिलेल्या परंतु अद्याप असंकलित राहिलेल्या लघुनिबंधांचा संग्रह. यात वाचकांना रानफुलांच्या रंग, गंध, आकार, सौंदर्याचा अस्सलपणा अनुभवायला मिळेल. रानफुले सुंदर असली तरी बर्‍याचदा उपेक्षित नि अस्पर्शित रहातात. मराठी साहित्य वाटिकेतून विहार केलेल्या अभ्यासू, संशोधक वाटसरुंचे या देशीकार सौंदर्य लेण्यांकडे अद्याप लक्ष कसं गेलं नाही याचं आश्र्चर्य वाटल्यावरून ती जिज्ञासू नव वाचकांसाठी मुद्दाम खुडून आणलीत. या लघुनिबंधातून तुम्हास खांडेकरांमधील विकसित, प्रौढविचारक भेटेल.

खांडेकर पांढरपेशांचे प्रतिनिधी लेखक होते म्हणणार्‍यांना या संग्रहातील अनेक निबंध ते वंचित, उपेक्षितांचे वाली कसे होते ते समजावतील. कपिंजल, महाश्र्वेता, पुंडरीक, विकर्ण, रामदास, हनुमान, पेंद्या, वृध्द इत्यादी चरित्रांचे खांडेकरांनी केलेले अभिनव चित्रण प्राचीन साहित्याकडे आपणास नव्या दृष्टीने पहाण्याची शिकवण देईल.

या संग्रहातील निबंधात गावरान मेव्याची मिठास जशी आहे तशी विलायती इलायचीची उग्रताही! अनोख्या मिश्रणांचं हे अद्‍भुत रसायन! जपाल, ठेवाल तसं कालौघात ते अधिक विस्फोटक होत राहणार, म्हणून वाचून रिचवणंच श्रेयस्कर नाही का?

Language Marathi
ISBN-10 8177662406
ISBN-13 9788177662405
No of pages 84
Font Size Medium
Book Publisher Mehta Publisher
Published Date 01 Jan 2002

About Author

Author : V. S. Khandekar

3 Books

Related Books