वपु सांगे वडिलांची कीर्ती (Marathi)

Va Pu Kale

Physical

Available

एखाद्या प्रथितयश लेखकाबद्दल वाचकांना कुतुहल असतं त्यांच्या आयुष्यात डोकावण्याची इच्छा असते आणि लेखकाची लहानपणापासुनची जडणघडण कशी झाली याबद्दलही जिज्ञासा असते. या जिज्ञासेसाठीच आत्मचरित्रे,आत्मकथने लिहली जातात. आणि वाचकांकडूनही त्याला चांगला प्रतिसाद मिळतो परंतु एखाद्या लेखकाच्या वडिलांचे व्यक्तिचित्र वाचावे असे रसिकांच्या मनात येत नाही. किंवा त्याबाबत रसिकांच्या मनोभूमिका तयार झालेली नसते. अशा पार्श्वभूमीवर आपल्या वडिलांचे व्यक्तिचित्रं आपल्या खास गोष्टीवेल्हाळ शैलीत मांडून वपुंनी एक नवीन प्रयोग केला आहे.

पुरुषोत्तम श्रीपत काळे हे 'वपुं’चे वडील आण्णा काळे कलावंत आहेत हे फक्त त्यांच्या कलाकृतीकडे पाहून कळत असे. इतर वेळी कुठल्याही चार सभ्य मराठी माणसारखे ते दिसत.

अण्णांनी रंगवलेले पडदे नाटकात टाळी घेतात. पडदे रंगवायची त्यांची स्वत:ची शैली आहे. आपल्या चिमुकल्या कुटुंबाला चारापाणी आणण्यासाठी पुण्यातल्या टुमदार बंगल्यातून सतत मुंबईच्या फेर्‍या करणारे,अपार कष्ट आणि व्यावहारिक फसवणूक होऊनही सतत आनंदी राहणारे अण्णा.

आपल्या समाजात वडिलांकडून आधार मिळतो, धाक असतोच, मार्गदर्शन वगैरे मिळते परंतु स्नेह क्वचित मिळतो. वपुंना अण्णांचा स्नेहही मिळाला. सोळा वर्षाच्या मुलाचे 'रुमपार्टनर’ होवू शकणारे असे वडील अण्णा - वपुंच्या वडिलांच्या विविधांगी, प्रसन्न कलंदर व्यक्तित्वाचं मनमोकळं दर्शन घडवणारे पुस्तक.

Language Marathi
ISBN-10 8177660519
ISBN-13 9788177660517
No of pages 96
Font Size Medium
Book Publisher Mehta Publishing house
Published Date 01 Jan 1973

About Author

Author : Va Pu Kale

9 Books

Related Books