वैदेही यांच्या निवडक कथा (Marathi)

Kavita Mahajan

Physical

In Circulation

अनुवादक उमा कुलकर्णी यांनी आजवर कन्नड साहित्यातील यू. आर. अनंतमूर्ती, एस. एल. भैरप्पा, वैदेही, के. पी. पूर्णचंद्र तेजस्वी यांच्या कथा-कादंबऱ्यांचे मराठीमध्ये सुगम अनुवाद करून हे मान्यवर साहित्यिक आणि त्यांचं साहित्य मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्याची बहुमोल कामगिरी केली आहे. याशिवाय त्यांनी वेळोवेळी कन्नड कथांचेही अनुवाद केले आहेत. त्यातील काही कथा या संग्रहात घेतल्या आहेत.

यात यू. आर. अनंतमूर्ती यांच्या तीन, के. पी. पूर्णचंद्र तेजस्वी यांच्या पाच, वैदेही यांच्या तीन आणि माधव कुलकर्णी यांच्या चार अशा एकंदर १५ कथांचा समावेश आहे. या कथासंग्रहातून कर्नाटकाच्या लोकजीवनाचेही काही प्रमाणात दर्शन होते.

महानगर आणि खेडं, समाजव्यवहार आणि कौटुंबिक जीवन, या दरम्यान यातील कथानाटय़ रंगत जातं. थोडक्यात कन्नड साहित्यातील हे आघाडीचे कथाकार आपल्या कथांमधून कुठले प्रश्न मांडू पाहत आहेत, जगण्याकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन नेमका कसा आहे, याची चुणूक या कथांमधून पाहायला मिळते.

Language Marathi
ISBN-10 B07MXXPVQS
No of pages 139
Font Size Medium
Book Publisher manovikas prakashan
Published Date 30 Nov -0001

About Author

Author : Kavita Mahajan

2 Books

Related Books