मनाच्या मध्यरात्री (Marathi)

Pravin Davane

Physical

In Circulation

लेखक प्रवीण दवणे यांच्या या वेगळ्या धाटणीच्या कथा. मनाच्या मध्यरात्री ही पहिलीच कथा एक लेखकाची आहे. 'लिहून प्रश्न सुटत नाहीत. प्रश्नातून लिहिणं होतं,' असा लेखकालाच धडा देणारी नायिका येथे भेटते.

प्रश्नांच्या गर्तेत सापडलेला 'प्रश्नडोह'मधील मिलिंद, 'संन्यासातही अजून संसाराचे तंतू शोधीत स्वतःला चकवीत आत्मशोध घेणारी मी खरी, असा प्रश्न करणारी 'झपताल'मधील अपर्णा, 'स्वप्नांचा छळवादी प्रवास'मधील नमिता, 'कोरा समास'मधील शिशिर, 'बेभान'मधील प्रसिद्ध गायिका अनुपमा अशा व्यक्तीरेखा या कथांमधून भेटतात. एकूण बारा कथा असणाऱ्या या संग्रहात माणसाचे विविध स्तरावरचे जगणे दिसते. प्रत्येक माणसाच्या मनाच्या तळघरात एक गुढ मध्यरात्र असते, तिचेच दर्शन घडते.

Language Marathi
ISBN-13 9789383466726
No of pages 152
Font Size Medium
Book Publisher Navchaitanya Prakashan
Published Date 30 Nov -0001

About Author

Author : Pravin Davane

7 Books

Related Books