मातृत्वाची आस (Marathi)

Jayshree Thatte Bhatt

Physical

Available

एकविसाव्या शतकातही अजून बाळ न होऊ शकणार्‍या स्त्रियांच्या पदरी निराशा येते कारण सामाजिक दृष्टिकोन अजूनही बदलत नाही. गर्भावस्थेत पहिल्या अठ्ठावीस दिवसांत बाळाचे लिंग ठरते. परंतु त्यांच्या पुढील प्रवासात अडथळे येऊ शकतात आणि मग काही वेळा पूर्ण पुरुष किंवा पूर्ण स्त्री न होता त्रिशंकू अवस्था होते. गुणसुत्रे, निरनिराळ्या संप्रेरकाचे परिणाम, मानसिक आघात, औषधांचे विपरीत परिणाम, व्हायरलइन्फेक्शन हे आणि असे अनेक परिणाम गर्भावर होतात. आणि मग व्यंगं निर्माण होतात.

मातृत्वाची आस पुरी करायची क्षमता स्त्रीमध्ये नसते किंवा पुरुषात कमतरता असते अशावेळी विज्ञानाने, तंत्रज्ञानाने मात करता येते, हा या कादंबरीतून संदेश देण्यात जयश्रीताई यशस्वी झाल्यात. इनफर्टिलिटि म्हणजे काय, त्यावर कोणते उपाय उपलब्ध आहेत याबद्दल संपूर्ण शास्त्रीय माहिती या कादंबरीतून मिळते. ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान याचा सुरेख मिलाफ यात आहेच त्याचबरोबर मानवी मनाची गुंतागुंतही हळुवारपणे सोडवली आहे.

- डॉ. स्नेहलता देशमुख (प्रस्तावनेतून)

Language Marathi
No of pages 169
Font Size Medium
Book Publisher majestic prakashan

About Author

Author : Jayshree Thatte Bhatt

1 Books

Related Books