हाऊज दॅट (Marathi)

Dilip Prabhavalkar

Physical

In Circulation

खेळाची आवड म्हणजे तो खेळायलाच हवा असे नाही. त्यात खेळ बघणे आले, त्रावर तासन्‌तास वाद, रिकाम्या चर्चा करणे आले, दैनिकांमधील रसभरीत वर्णने वाचणे आले-आणि मग काही वर्षांनी लिहिणेही आले.

क्रीडाक्षेत्रातल्या घटनांवर स्तंभलेखन करायचे म्हटल्यावर ही सगळी खेळांची आवड तर कामी आलीच, पण आजूबाजूला घडणार्‍या मैदानावरच्या आणि बाहेरच्या घटनांमधील विसंगतीकडे, अतिरेकाकडे गमतीने पाहणे आले. दिलीप प्रभावळकरांनी हे सर्व मनापासून केले.

प्रसंगी शुटिंगच्या वेळा सांभाळून केले. लिहिताना त्यांना जेवढी मजा आली तेवढीच वाचताना वाचकांना यावी. दिलीप प्रभावळकरांच्या निर्विष विनोदाची साक्ष या संग्रहातून मिळते.

Language Marathi
No of pages 152
Font Size Medium
Book Publisher Akshar Prakashan
Published Date 01 Jan 2005

About Author

Author : Dilip Prabhavalkar

1 Books

Related Books