आपल्या विधिलिखिताचा शोध घ्या (Marathi)

Robin Sharma

Physical

In Circulation

नवी जीवनसृष्टी आणि आशयदृष्ट्या सखोलता तसेच जागतिक दर्जा, यांच्यासह द मंक व्हू सोल्ड हिज फेरारी च्या मालिकेतील हे एक नवीन पुष्प आहे: आपल्या विधीलीखीताचा शोध घ्या. दार सॅन्डरसन हा या संपूर्ण कथेचा नायक. अत्यंत उमद्या स्वभावाचा पण महत्वाकांशी एक्झिक्युटिव्ह, आपल्या कुटुंबापासून (बायका-मुलांपासून) तुटतो आणि जीवनात गमावलेला अर्थ मृत्यूत शोधण्याचा प्रयत्न करतो. त्याचे अवघे व्यावसायिक जीवनही एके क्षणी विस्कळीत होऊन जाते.

एकूणच वेदनेत बुडालेल्या दारची एका आंतरिक शांततेच्या व जागृतीच्या गाभ्यापर्यंतची परिपक्वतेकडे जाणारी वाटचाल यात चित्रित केली गेलेली आहे. ती विलक्षण नाट्यपूर्णतेने.

मृत्युच्या दारापाशी आयुष्य संपवायला गेलेल्या दारची एके क्षणी जूलियन मेंटलची गाठ पडते आणि त्याचे अवघे आयुष्यच बदलून जाते. त्याच्या आत्म्याला जाग येते आणि एका नव्या जागरणाचा प्रारंभ होतो. खरे तर हे एक आत्मिक पुनरुथ्थानच आहे. एका असामान्यत्वाकडे जाणारी ही अभिजात पाउलवाट आहे.

Language Marathi
ISBN-10 8184951434
ISBN-13 9788184951431
No of pages 221
Font Size Medium
Book Publisher Jaico Books
Published Date 22 Jul 2010

About Author

Author : Robin Sharma

28 Books

"जगभराच्या लोकांना मार्गदर्शन करणारी रॉबिन शर्मा यांची पुस्तकं मार्गदर्शन करीत आहेत."

Related Books