चिकन सूप फॉर द वुमन्स सोल (Marathi)

Jack Canfiel , Mark Victor Hansen & Jennifer Read H

Physical

In Circulation

स्त्रीची व्याख्या अनेक प्रकारांनी करता येईल. विदयार्थिनी, कन्या, मैत्रिण, पत्नी, आई, गॄहिणी, व्यावसायी! प्रत्येक रूप हे खास व अलौकिक असे असते. तरी त्यांतही एक असा सामान्य धागा असतो. तो प्रत्येकीच्या स्वभावात असतो. प्रेमाचे बंध हळुवारपणे जपणारी, आजीवन मैत्री किंवा नाते निभावणारी, निवडलेल्या क्षेत्रांशी बांधिलकी घट्ट करणारी ही स्त्री!

कौटुंबिक जीवनात फुलोरा फुलवणारी, त्याचबरोबर सामाजिक जीवनही सुसहय करणारी! च्या हया मालिकेत वेगवेगळया शीर्षकांखाली भावभावनांचे खास मिश्रण आहे! या पुस्तकामध्ये स्त्रीशी निगडीत असलेल्या सा-या गुणवैशिष्टयांचे मार्मिक चित्रण आढळते. स्त्रीच्या आत्म्याची मंगलता व सौंदर्य इथे प्रगट होते! व्यावसायिक असो की गॄहिणी, बालिकेपासून वॄद्ध स्त्रीपर्यंत सगळयांना हे अनुभव भावतील.

हयातून त्यांना स्फूर्ती, आनंद मिळेल. इतकेच नव्हे; तर स्वत:चीही ओळख होऊ शकेल. हया अनुभवांची सोबत दीर्घकालपर्यंत स्त्रियांना मिळू शकेल.

Language Marathi
ISBN-10 8177668013
ISBN-13 9788177668018
No of pages 226
Font Size Medium
Book Publisher Mehta Publishing house
Published Date 01 Jan 2007

स्त्री मनोगुणंचा शोध घेणाऱ्या कथा

Related Books