माणूस चुका का करतो ? (Marathi)

Dr.Sanjay Oak

Physical

In Circulation

'चूक म्हणजे नक्की काय?' तर चूक म्हणजे फसलेलं गणित, निसटलेला अंदाज, घसरणीवरचा पाय आणि न जुळणारे हिशोब. चूक म्हणजे अकल्पितता, चुक म्हणजे अकस्मात घडणाऱ्या घटनेची नांदी.

'चुका कुणाकडून होत नाहीत' त्या वैद्यकीय व्यावसायिकांकडून होतात आणि आजच्या जगात त्याचा विशेष बोभाटाही होतो. चूक रोगनिदानात होते, कसलेल्या शल्यक्रियेत होते, लॅबोरेटरीला पाठविण्याच्या सँपलच्या लेबलमध्ये होते आणि प्रत्यक्ष मृत्यूने गाठल्यानंतर मृतदेहाच्या अदलाबदलीत होते. गेली ३५ वर्षे मी वैद्यकीय क्षेत्रात काढली आहेत. अनेक चुकांना मी सामोरा गेलो आहे. त्यापैकी काही माझ्याकडूनही घडल्या आहेत आणि काहींच्या बाबतीत मी साक्षीदार आहे. चुकांची परिणिती गंभीर गुंतागुंतीची झाल्याचेही अनुभवले आहे.

शस्त्रक्रियेच्या बाबतीत बोलावयाचे झाल्यास चुकीच्या रुग्णावर केलेली शस्त्रक्रिया, चुकीच्या बाजूच्या अवयवावर किंवा इंद्रियावर केलेली शस्त्रक्रिया, शस्त्रक्रिया केल्यानंतर शस्त्रक्रियेच्या वेळी शरीरात राहिलेले गॉज पिस आणि हत्यारे आणि कधी कधी प्रत्यक्ष शस्त्रक्रियेमध्ये झालेली क्षणाची घोडचूक किती महागात पडते याची मला जाणीव आहे.

पण चुका ह्या काही केवळ वैद्यकीय परिघामध्ये होतात असे नाही. दोन्ही बाजूंनी बोगदे खोदतांना झालेल्या अभियांत्रिकी चुका ते जेव्हा एकमेकांना मिळू शकत नाहीत, तेव्हा फसलेल्या प्रकल्पाच्या स्वरूपात जनतेसमोर आल्या आहेत. कुठे इमारतींचा डोलारा काही अंशानी कलला आहे, तर कुठे त्याचा पाया भुसभुशीत होऊन तो खोलवर खचला आहे.

Language Marathi
ISBN-10 8180860647
ISBN-13 9788180860645
No of pages 126
Font Size Medium
Book Publisher Parchure Prakashan
Published Date 01 Jan 2015

About Author

Author : Dr.Sanjay Oak

2 Books

Related Books