परवचा (Marathi)

Vyankatesh Madgulkar

Physical

Available

मुंग्या या पृथ्वीवर माणसाच्या अगोदरपासूनच्या रहिवासी आहेत आणि एक मुंगी कधी नसते. समाज असतो. मोठं अद्भुत असं सामाजिक जीवन आहे मुंग्यांचं. त्यांच्या समाजात शेती करणा-या, प्राणिसंवर्धन करणाऱ्या, लढणाऱ्या, गुलामगिरी करणाऱ्या, चोरी करणाऱ्या, भीक मागणाऱ्या मुंग्या आहेत. काही कामकरी मुंग्यांची पोटं शरीराच्या मानानं अवाढव्य असतात. त्या हालचाली कमी करतात.

इतर साध्या कामकरी मुंग्या बाहेरून मध आणून यांना खाऊ घालतात. मोठ्या पोटाच्या मुंग्या मिळेल तेवढा मध पिऊन घेतात. तो पचत नाही. तसाच राहतो. वारुळातल्या मुंग्यांना जेव्हा खायला मिळत नाही, तेव्हा त्या या मधमुंग्यांना ठार करतात आणि त्यांच्या पोटात साठलेला मध खातात. आपल्याकडे काही आदिवासी या मुंग्या द्रोण भरून बाजारात विकायला आणतात.

Language Marathi
ISBN-10 8184983808
ISBN-13 9788184983807
No of pages 222
Font Size Medium
Book Publisher Mehta Publishing house
Published Date 01 Jan 1994

About Author

Author : Vyankatesh Madgulkar

9 Books

Related Books