कातळ (Marathi)

Ranjeet Desai

Physical

In Circulation

1948 साली कूळकायदा आला. या कायद्यानं शेकडो वर्ष अबाधित राहिलेली जीवनाची घडी पार विसकटून गेली. पड जमिनीला प्रथम नांगर लागताच जमिनीची जी दशा होते, तीच दशा ग्रामीण भागातल्या सुप्त व संथ जीवनाला प्राप्त झाली. जमिनीच्या आसर्‍यानं जीवन जगणारे सारे समाजथर या कायद्यानं बदलले.

इनामदारांपासून ते छोट्या शेतकर्‍यांपर्यंत, देवस्थानापासून ते बारा बलुतेदारारांपर्यंत. इनामदाराच्या मिराशीवर कुळांकडून खंड वसूल करणारा देसाई, देशमुख, देशपांडे, पाटील, कुलकर्णी, खोत यांच्यासारखा वतनदार-वर्ग जसा जमिनीला मुकला, तसाच, शहरांत गिरण्यांतून काबाडकष्ट करीत, आयुष्यभर राबत, मिळालेली कमाई गावी पाठवून जमीन विकत घेतलेला मजूरही ती जमीन कुळाच्या हाती सुपूर्द करून मोकळा झाला.

याच काळात नवनवीन स्थित्यंतरं घडत होती. नव्या सुधारणा विजेच्या वेगानं घडत होत्या. त्यांचा धक्का बसला खेड्यांतून चालत आलेल्या पिढ्यान्पिढ्यांच्या एकत्र कुटुंबपद्धतीला. जमीनविषयक झालेल्या कायद्यांनी घराघरांतून वाटण्या सुरू झाल्या. बाप-मुलगा, भाऊ-भाऊ यांच्यांत भांडणं सुरू झाली. सारं ग्रामीण जीवन या नांगरटीत उलथंपालथं झालं.

या बदलत्या जीवनाचा, बदलत्या संस्कारांचा मागोवा घेणार्‍या, रणजित देसाईंच्या सिद्धहस्त शैलीतील "पेरा उगवला’ आणि "पांढर उठली’ या मस्तक सुन्न करणार्‍या दोन दीर्घकथांचा अविस्मरणीय संग्रह : "का त ळ’!

Language Marathi
ISBN-10 8177668188
ISBN-13 9788177668186
No of pages 166
Font Size Medium
Book Publisher Mehta Publishing house
Published Date 01 Aug 1965

About Author

Author : Ranjeet Desai

19 Books

Related Books